आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनकनंतर दुसऱ्या भारतवंशीयाची झेप:मूळ सिंधुदुर्गचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान

डब्लिन / गौरवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतवंशीय लिओ वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. ४३ वर्षीय वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. आयर्लंडचे शेजारी राष्ट्र ब्रिटनचे पंतप्रधानही भारतवंशीय ऋषी सुनक आहेत.

मतदानात वराडकर यांना ८७ व त्यांचे प्रतिस्पर्धी मायकेल मार्टिन यांना ६७ मते पडली. वराडकर आयर्लंडमध्ये आघाडी सरकार चालवतील. त्यांचा पक्ष फाइन गेलचे फिआना फायेलची ग्रीन पार्टीसोबत आघाडी आहे. वराडकर यांच्यासमोर आयर्लंडच्या अर्थव्यवस्थेला पटरीवर आणण्याचे आव्हान असेल.

ब्रेक्झिटनंतर आयर्लंडची आर्थिक घडी विस्कटली आहे. आर्थिक मुद्द्यांवर लिओ वराडकर लवकरच ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

वराड गावचे आहेत लियो

लिओ वराडकर यांचे वडील डॉ. अशोक वराडकर मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे आहेत. लिओ यांची आई मिरियेम ब्रिटिश वंशाच्या आहेत. लिओ वराडकर व्यवसायाने डॉक्टर आहेत. पंतप्रधान असताना वराडकर आई-वडील, बहीण सोफिया आणि इतर नातेवाइकांसोबत २०१९ मध्ये वराड गावी आले होते.

बातम्या आणखी आहेत...