आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Less Than 2 Crore People Paying Income Tax In The Country, Uttar Pradesh, Bihar, Madhya Pradesh, West Bengal And Maharashtra Account For 48% Of The Income Tax.

देशात इन्कम टॅक्स भरणारे लोक 2 कोटींपेक्षाही कमी:आयकरात 48% वाटा उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल अन् महाराष्ट्राचा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत ६०% लोक कर भरतात; प्रमुख अर्थव्यवस्थांत लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी करदाते भारतात, तरीही सातत्याने वाढतेय करसंकलन

आपल्या देशात केवळ ६% करदाते आहेत, त्यापैकी ५.५% वर शून्य कर आहे. २०२०-२१ मध्ये शेवटच्या वेळी सार्वजनिक झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण १३२ कोटी लोकसंख्येत फक्त ८.२२ कोटी करदाते होते. यातील ७.५ कोटी करदाते शून्य कराच्या कक्षेत येतात. दुसरीकडे, मोठी लोकसंख्या तगडी कमाई करूनही कर भरत नाही. सरकारच नव्हे तर अनेक अर्थतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. अशात सुमारे १.५ कोटी करदात्यांच्या बळावरच केंद्र सरकारला आयकर जमा करून घ्यावा लागत आहे. अमेरिकेत ६० टक्के लोकसंख्या आयकर भरते. देशात आयकर वसुलीत ४८% वाटा यूपी, बिहार, महाराष्ट्रासह ५ राज्यांचा आहे.

उत्पन्न गट; १० लाखांपेक्षा कर भरणारे ८ टक्केच
देशात १ कोटी रुपयांहून जास्त कर भरणाऱ्यांची संख्या ५ हजारांवर
{देशात १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर भरणाऱ्यांची संख्या : ३०,०८,०३३
{१ ते १० लाख रुपयांदरम्यान कर भरणारे एकूण करदाते : २७,९३,४६३
{१० ते ५० लाख रुपयांपर्यंत कर भरणाऱ्यांची एकूण संख्या : १,९६,५३५
{५० लाख ते १ कोटी रुपये कर भरणाऱ्यांचा एकूण आकडा : १२,९६३
{१ कोटी रुपयांहून जास्त कर भरणाऱ्यांची एकूण संख्या : ५,०७२

वार्षिक कमाई करदाते
२.५ लाखांहून खाली ५७%
२.५-५ लाख रु. १८%
५-१० लाख रु. १७%
१०-५० लाख रु. ७%
५० लाखांहून जास्त १%
आकडेवारी अॉगस्ट २०२० पर्यंतची

... दुसरीकडे, दरवर्षी ११% वेगाने वाढत आहेत कोट्यधीश

{वित्तमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार, 2021-22 मध्ये 10 लाख ते एक कोटी रु. एकूण उत्पन्न असणाऱ्या लोकांची संख्या 77 लाखांवर गेली. {वेल्थ हुरुन इंडिया 2021 च्या एका अहवालानुसार, देशात वर्षभरात 7 कोटींवर संपत्ती असणाऱ्यांची संख्या 11% वाढून 4.58 लाखांवर पोहोचली.

यूपी सर्वाधिक कमावते; राज्याचा १८% वाटा
{केंद्राच्या एकूण कर संकलनात राज्यांच्या वाट्याचे १०.२१ लाख कोटी रु. येतात. त्यात यूपी १.८ लाख कोटी रु. म्हणजे १८% भागीदारीसह प्रथम स्थानी
{बिहारची १०%, मध्य प्रदेशची ८%, महाराष्ट्र-राजस्थानची ६-६% आहे.

राज्य इन्कम टॅक्स एकूण टॅक्स
उत्तर प्रदेश ५७,०५७ १.८३ लाख
बिहार ३१,९९० १.०२ लाख
मध्य प्रदेश २४,९६८ ०.८ लाख
प. बंगाल २३,९२७ ०.७ लाख
महाराष्ट्र २०,०९२ ०.६ लाख
राजस्थान १९,१६६ ०.६ लाख
तामिळनाडू १२,९७४ ०.४ लाख
आंध्र प्रदेश १२,८७२ ०.४ लाख
{कराचे सर्व आकडे कोटी रुपयांत

{अर्थ मंत्रालयाच्या अहवालातील केंद्राच्या टॅक्स-शुल्कात राज्याच्या वाट्याची आकडेवारी.

बातम्या आणखी आहेत...