आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:शाळांसाठी हॉलीवूड चित्रपटांतून धडे; 'डेड पोएट सोसायटी' सर्वोत्कृष्ट चित्रपट - 5 मोठे धडे

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधने24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का, सबको मंजिल का शौक है और मुझे सही रास्तों का ~ अज्ञात

करिअर फंडात स्वागत!

सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक संदेश- चांगल्या चित्रपटांतून आपण सर्वजण चांगल्या गोष्टी शिकू शकतो, हो ना? चला तर मग, आज आपण अशाच एका मार्मिक चित्रपटावर चर्चा करूया.

पीटर विअर दिग्दर्शित डेड पोएट्स सोसायटी (Dead Poets’ Society) 1989 मध्ये रिलिज झालेला एक इन्स्पायरिंग चित्रपट आहे. तो एक ऑर्थोडॉक्स (पुराणमतवादी) शाळा (व्हेल्टन अकादमी) व एक नवे इंग्रजी शिक्षक -मिस्टर कीटिंग यांच्यावर आधारित आहे. 1959 च्या काळावर आधारित हा एक पिक्शनल चित्रपट आहे. या चित्रपटाने बाफ्टा सर्वोत्कृष्ट चित्रपट व बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्लेच्या अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

अत्याधिक शिस्त विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य

मिस्टर कीटिंग आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचारवंत बनवण्याच्या उद्देशाने अपारंपरिक शिक्षण पद्धतींचा प्रयोग करू इच्छितात. ते शाळेचे कठोर मुख्याध्यापक गेल नोलन यांना आवडत नाही.

या प्रयत्नांत शिक्षक कीटिंग त्यांच्या एका विद्यार्थ्याला (नील पेरी) प्रोत्साहित करतात ज्याला खरोखर अभिनेता व्हायचे आहे. पण त्याच्या वडिलांची इच्छा असते की, यासाठी त्याने अभिनयाचे सर्वोत्तम धडे देणाऱ्या देशातील सर्वोत्तम महाविद्यालयात जावे. या प्रकरणी नील पेरीचे वडील त्याला वेल्टन अकादमीतून काढून लष्करी अकादमीत प्रवेश मिळवून देतात. यामुळे नील एकेदिवशी वडिलांच्या रिव्हॉल्वहरने आत्महत्या करतो. शाळेचे कठोर मुख्याध्यापक नीलच्या आत्महत्येसाठी मिस्टर कीटिंगला दोष देण्याचा प्रयत्न करतात.

डेड पोएट सोसायटी चित्रपटाचे 5 महत्त्वाचे धडे

1) 'मानवते'चा विषय म्हणून महत्त्व - हा चित्रपट विज्ञान व गणिताच्या वेड्या शाळा, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी मानवतेच्या विषयांचे (भाषा, इतिहास, राज्यशास्त्र) महत्त्व अधोरेखित करतो. चित्रपटात शिक्षक कीटिंग आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात की, उद्योग, बँकिंग, लष्करी आदी सर्व गोष्टी जीवन सुलभ, आरामदायी व सुरक्षित बनवतात. पण आपली इच्छा "कविता, सौंदर्य, प्रणय, प्रेम... या गोष्टींसाठी जगण्याची असते." या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकल्या तर जीवनाचा अर्थच संपून जाईल.

2) विद्यार्थ्यांना करिअरच्या विशिष्ट प्रवाहासाठी मजबूर करणे – आपल्या स्वप्नांवर काम न करण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे – आपल्यापैकी बरेच जण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. पण आयुष्य एवढे मोठे नाही. त्यामुळे आपल्या पसंतीचे काम करताना आनंदी राहण्यासाठी जीवनशैली व आर्थिक सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाची आहे, हे शाळा व पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. या प्रकरणी मध्यम मार्ग काढता येऊ शकतो की, कशा प्रकारे आपण आपल्या पसंतीचे काम करताना एक चांगली, सुरक्षित व आदरयुक्त जीवन कसे जगावे.

3) मुलांशी संवाद - संभाषण ही एकमेकांना समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे - एक आदर्श विद्यार्थी व मुलगा, नील पेरी, याला लवकरच समजते की, त्याची आवड इतरत्र आहे व ती त्याच्या वडिलांसारखीच आहे. पण जेव्हा त्याच्या वडिलांना हे समजत नाही, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम झाले. नील सर्वांना उद्ध्वस्त करणारा निर्णय घेतो. हे बुद्धिमान संवादाच्या अभावामुळे घडले. विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक व शाळेसमोर व्यक्त होण्यास संकोच करू नये. पण त्यांना पोषक वातावरण असेल तरच विद्यार्थी असे करू शकतील.

4) चौकटीबाहेरचे विचार - दृष्टिकोनात बदल - कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही असे आपल्याला वाटते. दृष्टीकोन बदलण्यासाठी, मिस्टर जॉन कीटिंग त्यांच्या विद्यार्थ्यांना टेबलच्या वर उभे राहण्यास व आजूबाजूला पाहण्यास सांगतात. दृष्टिकोनातील बदल तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे त्याच जुन्या सांसारिक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. कारण काहीवेळा आपण जो बदल शोधत असतो तो नवीन नोकरी, नवीन शहर किंवा नवीन व्यक्ती नसतो. अनेकदा आपण जगाकडे कसे पाहतो, हा बदल आपल्या स्वतःला घडवून आणावा लागतो.

5) कृती आवश्यक - शिक्षक कीटिंग आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, 'दिवस जप्त करा'(Seize the day),अर्थात आजच सर्व काही आहे. बोलणे, स्वप्न पाहणे ठीक आहे. पण शेवटी कृतीतून यश मिळेल. जोपर्यंत तुम्ही कल्पना अंमलात आणणार नाही, तोपर्यंत बोलणे, नियोजन करणे व रणनीती आखणे हे निष्फळ आहे. शाळा व पालकांनी विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला इतर धडे, उदाहरणार्थ मित्रांशी एकनिष्ठ राहणे, अधिक आत्मविश्वास बाळगणे व उच्च स्वाभिमान शिकणे, राजकारण व दोष देण्याचे तोटे आदी गोष्टी आपल्याला शिकता येतात.

तर आजचा करिअर फंडा हा आहे की, आंधळ्या शर्यतीत पैशांच्या करिअरमागे धावणे निव्वळ मूर्खपणा आहे. आणि हो, भरपूर कविता वाचा!

करून दाखवूया!

बातम्या आणखी आहेत...