आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांचा सुरक्षादलावर हल्ला:एक पोलिस शहीद, सुरक्षा दलांनी परिसराला घातला वेढा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पिंगलाना भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस शहीद झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.

हा हल्ला अशावेळी झाला आहे, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 4-5 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते 4 ऑक्टोबरला राजौरी आणि 5 ऑक्टोबरला बारामुल्ला येथे असतील.

अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये 5 दिवसांत 7 दहशतवादी मारले गेले आहेत. या दौर्‍यादरम्यान ते या राज्यातील सुरक्षास्थितीचा आढावा घेतील, दोन सभांना संबोधित करतील तसेच वैष्णो देवीचे दर्शन घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...