आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची टिप्पणी:कॉलेजियमला आपले काम करू द्या, आम्ही पारदर्शक : सुप्रीम कोर्ट

दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्या. एम.आर.शहा यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले की, जी सिस्टिम काम करत आहे, ती रुळावरून उतरू देऊ नका.

कॉलेजियमला आपले काम करू द्या. आम्ही सर्वात पारदर्शक संस्था आहोत. सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी अंजली भारद्वाज यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी दिल्ली हायकोर्टाच्या एका निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने आरटीआयअंतर्गत १२ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या बैठकीची माहिती मागितली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.

बातम्या आणखी आहेत...