आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Leveling For Ram Temple Started In Ayadhya, Many Artifacts Including Shivling Kalsa Were Found

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम जन्मभूमी:अयाेध्येत राम मंदिरासाठी सपाटीकरण सुरू, शिवलिंग-कळसासह अनेक कलाकृती सापडल्या

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रामजन्मभूमी संकुलातील सपाटीकरण दरम्यान सापडलेले खांब - Divya Marathi
रामजन्मभूमी संकुलातील सपाटीकरण दरम्यान सापडलेले खांब
  • लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन करत मंदिर बांधण्यासाठी जमिनीवर ११ मेपासून कामाला सुरुवात

उत्तर प्रदेशात अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी जमीन सपाट करण्याचे काम सुरू आहे. या वेळी खोदकामात शिवलिंग, कळसासह अनेक कलाकृती मिळाल्या. लोखंडी सळयांचे कुंपण तसेच रस्ता तोडण्याचे काम सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थळ ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी बुधवारी सांगितले की, कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन करत मंदिर बांधण्यासाठी जमिनीवर ११ मेपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे काम धीम्या गतीने सुरू आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क आदींचा वापर करण्यात येत आहे. जमीन सपाट करत असताना मोठ्या प्रमाणात देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती, पुष्प, कळस, अमलक, दोरजांब यासारख्या कलाकृती सापडत आहेत. कमानीचे दगड, सात ब्लॅक टच स्टोनचे खांब, सहा रेड टच स्टोनचे खांब, पाच फुटांचे शिवलिंग सापडले आहे. १० मजूर हे काम करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...