आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • LG Withdraws 5 Day Government Quarantine Order, Corona Positive Will Be Able To Remain In Home Isolation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना:दिल्ली सरकार काेर्टात जाताच राज्यपालांचा पाच दिवसांचा क्वाॅरंटाइनचा आदेश मागे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ज्यांच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नाही त्यांनीच सरकारच्या काेराेना केअर सेंटरमध्ये यावे'

दिल्ली येथील काेराेना रुग्णांची संख्या ५३ हजारांवर पाेहाेचली आहे. याच वेळी रुग्णांना पाच दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यावरून वाद वाढला. राज्य सरकारने न्यायालयात धाव घेताच उपराज्यपाल अनिल बैजल दबावात आले. त्यांनी अवघ्या २४ तासांच्या आत आपले आदेश मागे घेत ‘आता ज्यांच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नाही त्यांनीच सरकारच्या काेराेना केअर सेंटरमध्ये यावे,’ असे ट्विट केले. 

घरातील विलगीकरणाविषयी उपराज्यपालांना जी शंका हाेती ती आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत दूर झाल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांनी सांगितले. आयसीएमआरने साैम्य लक्षणे असलेल्या काेराेना रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. तेव्हा इतर राज्यांना अशा विलगीकरणासाठी वेगळा नियम आणि दिल्लीसाठीच वेगळा नियम का, असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...