आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्ट:LIC च्या IPO मध्ये रिझर्वेशन पाहिजे असेल तर लवकर अपडेट करा आपला पॅन, 28 फेब्रुवारी आहे डेडलाइन

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये रिझर्वेशन पाहिजे असेल तर त्यांच्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे एलआयसी पोर्टलवर पॅन अपडेट केले जावे आणि दुसरे म्हणजे त्यांचे डिमॅट खाते असावे. एलआयसीचा आयपीओ पुढील महिन्यात मार्चमध्ये लॉन्च होऊ शकतो.

LIC च्या IPO मध्ये 31 कोटी 62 लाख 49 हजार 885 शेअर्स विकले जातील, जे 5% भागीदारीच्या समान आहे. यापैकी 10% म्हणजेच 3.16 कोटी शेअर्स अशा लोकांसाठी राखीव असतील ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी आहे. रिझर्वेशनचा फायदा असा होईल की LIC च्या पॉलिसीधारकांसाठी शेअर अलॉटमेंटची शक्यता वाढेल.

LIC ने दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या मसुद्यानुसार, पॉलिसीधारकांनी 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी त्यांचे पॅन अपडेट न केल्यास त्यांना IPO मध्ये आरक्षण मिळणार नाही.

अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला एलआयसी पोर्टलवर पॅन अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत: LIC वेबसाइटवर जा.

  1. ईमेल आयडी, पॅन, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि पॉलिसी क्रमांक भरा.
  2. बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.
  3. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP साठी रिक्वेस्ट करा.
  4. ओटीपी मिळाल्यावर तो भरा आणि सबमिट करा.
  5. फॉर्म सबमिट केल्यानंतर, रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मॅसेज ​​येईल.

पॅन अपडेट झाला आहे की नाही हे कसे तपासायचे

  1. LIC वेबसाइट किंवा लिंकवर जावे.
  2. पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन माहिती तसेच कॅप्चा टाका. त्यानंतर सबमिट बटण दाबा.
  3. यानंतर तुम्हाला कळेल की पॅन तुमच्या पॉलिसीशी लिंक आहे की नाही.

डीमॅट अकाउंट आवश्यक आहे
जर पॉलिसी धारकाचे सध्या डिमॅट खाते नसेल तर ते उघडावे लागेल. इक्विटी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. डीमॅट खाते उघडण्यासाठी आधार, पॅन डिटेल आणि पत्ता पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तुम्ही ऑनलाइन देखील डिमॅट खाते उघडू शकता.

बातम्या आणखी आहेत...