आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दोष:हाथरस अत्याचार - हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जन्मठेप

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाथरस सामूहिक अत्याचार-हत्या प्रकरणात गुरुवारी विशेष न्यायालयाने ४ आरोपींपैकी केवळ एक संदीपला(२०) दोषी मानले. इतर ३ आरोपींना निर्दाेष मुक्त केले. अडीच वर्षांनंतर न्यायालयाने संदीपला सदोष मनुष्यवध आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दोषी मानले आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ४ आरोपींपैकी कुणावरही सामूहिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला नाही. दुसरीकडे, पीडित पक्षाचे वकील म्हणाले की, ते न्यायालयाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात जातील. आरोपी लवकुश, रामू उर्फ रामकुमार आणि रवी उर्फ रवींद्र सिंहला कोर्टाने निर्दोष मुक्त केले. प्रकरणत हाथरसच्या चंदपा क्षेत्रातील एका गावातील आहे. १४ सप्टेंबर २०२० रोजी दलित युवतीवर सामूहिक अत्याचार प्रकरण समोर आले. गावातील ४ युवकांवर आरोप ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...