आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हे छायाचित्र बालपणापासूनचे मित्र अनामिका भारतीय आणि राहुल सिंह दिवाकर यांचे आहे. ते सोमवारी स्पायनल री-हॅब सेंटरमध्ये विवाहबंधनात अडकले. २००८ मध्ये त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सर्वकाही सुरळीत असतानाच २०१६ मध्ये राहुलचा अपघात झाला. मणक्याच्या दुखापतीमुळे त्याचे पूर्ण आयुष्य पालटून गेले. राहुलला पूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर काढावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. अशा कठीण स्थितीतही अनामिकाने राहुलची पुढेही साथ देण्याचे ठरवले. अनामिकाचा संकल्प आणि राहुलच्या इच्छाशक्तीमुळे सर्वकाही सुरळीत झाले. सोमवारी सायंकाळी राहुल आणि अनामिकाने आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन घेतले.
राहुल सांगतो की, मी नेहमी कुठेही जाण्यापूर्वी अनामिकाला भेटायचो. मात्र २०१६ मध्ये परीक्षेला जाण्यापूर्वी तिला भेटू शकलो नाही. त्याच दिवशी गाडीवरून जात असताना अपघातात पाठीला गंभीर दुखापत झाली. मात्र ही इजा आयुष्यभराचे दुखणे ठरेल असे क्षणभरही वाटले नव्हते. या संकटकाळात अनामिका सावलीप्रमाणे सोबत होती. माझे वडील सैन्यात होते तर आई आणि बहीण शिक्षिका आहेत. दोघीही कामावर गेल्यानंतर मी घरी एकटाच असायचो. तेव्हा अनामिकाच माझी काळजी घ्यायची, असे त्याने सांगितले.
वाढदिवशी विवाह
राहुलचा सोमवारी २९ वा वाढदिवस होता. याच दिवशी राहुल आणि अनामिका यांचा विवाह पार पडला. राहुलचे बी.टेक. झाले असून तो एमएनसीमध्ये नोकरीला आहे. या जोडप्याचा आनंद द्विगुणित करण्याची जबाबदारी री-हॅब सेंटर-२८ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निकी पी सिंह यांनी घेतली होती. त्यांनी या सेंटरमध्येच जोडप्याच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.