आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने ज्या कट्टरपंथीविरोधी शाखा स्थापन करण्याची घोषणा केली होती, त्याच धर्तीवर भाजपशासित सर्व राज्यांत अशा शाखेची स्थापन केली जाईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जेवढ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यात जेथे भाजप सत्तेत नाही तेथे निवडणूक जाहीरनाम्यात ही शाखा स्थापण्याची घोषणा अनिवार्यपणे केली जाईल. पक्षाचे एक ज्येष्ठ सरचिटणीस म्हणाले की, दहशतवाद नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे की, त्याची सुरुवातीची विचारसरणीच नष्ट केली पाहिजे. यावर संपूर्ण विचार केल्यानंतर भाजपने गुजरातमध्ये जाहीरनाम्यात कट्टरपंथविरोधी शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले. आता भाजपशासित राज्ये यासाठी पुढाकार घेतील.
या दिशेने केंद्र सरकारही एखादा कायदा आणू शकते
सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणाले की, सध्या केंद्र सरकार यासाठी कोणताही कायदा आणत नाही. मात्र, राज्य सरकारने स्वत:हून या दिशेने पुढाकार घेतल्यास चांगले होईल. सर्व किंवा बहुतांश राज्यांना वाटत असेल की, केंद्राने या दृष्टीने विचार करावा त्यानंतर सरकार तसा विचार करू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.