आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Limited Number Condition For Chardham Yatra, But Crowd Of Tourists At Hill Statio

ग्राउंड रिपोर्ट:चारधाम यात्रेसाठी मर्यादित संख्येची अट, पण हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी; मसुरी-नैनितालमधील बहुतांश हॉटेल बुक

डेहराडून15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मसुरी-नैनितालमध्ये सात दिवसांत 6.5 लाख पर्यटक, चारधामचे भाविकही दाखल

चारधाम यात्रा सुरू होऊन १५ दिवस झाले आहेत, पण भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या नियमामुळे स्थानिक व्यावसायिक नाराज आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीत दररोज एक हजार भाविकांनाच दर्शनाची परवानगी आहे. ई-पास आवश्यक आहे. दुसरीकडे, हिल स्टेशनला जाण्यासाठी या दोन्ही अटी नाहीत. त्यामुळे नैनिताल, मसुरीत मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत चारधाम यात्रेसाठी ई-पासचे बुकिंग फुल्ल आहे, पण लोक ई-पासविनाच येत आहेत. त्यामुळे दररोज ७ हजारपेक्षा जास्त भाविकांना मधूनच परतावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश भाविक मसुरी, नैनिताल अशा हिल स्टेशनला जात आहेत. मसुरीत दिवसभरात ८५ हजार वाहने येत आहेत. मसुरी, नैनिताल, चकराता, हर्षिल आणि मुक्तेश्वरमध्ये हॉटेलचे बुकिंग फुल्ल आहे. इतर पर्यटनस्थळीही अशीच गर्दी आहे. चारधाममध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार ठरवलेल्या संख्येतच भाविक पोहोचावेत यासाठी राज्य मार्गांवर तपासणी नाके आणि अडथळे लावण्यात आले आहेत. हरिद्वारपासूनच असे अडथळे सुरू होत आहेत, त्यामुळे लांब रांगा लागत आहेत. गुजरातच्या अमरेली येथून रवींद्र मेहता कुटंुबातील १६ जणांसह आले आहेत. ते म्हणाले की, हरिद्वारमध्ये ५ तासांपासून रांगेत उभे आहोत.

ई-पास असलेल्या आणि नसलेल्यांनाही एकाच रांगेत उभे केले आहे. पास नसणाऱ्यांना जाऊ दिले जात नाही. त्यामुळे ते वाद घालत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या पासधारकांचा वेळ वाया जात आहे. जयपूरहून आलेले लोकेंद्र कौशिक यांनी सांगितले की, मी कुटुंबासह चारधाम यात्रेला आलो आहे. ई-पास नसेल तर पुढे जाऊ दिले जाणार नाही, असे हरिद्वारला आल्यानंतर सांगण्यात आले. त्यामुळे आता आम्ही मसुरीला पर्यटनासाठी जात आहोत, कारण त्यासाठी ई-पासची गरज नाही. मसुरीच्या किताबघर चौकात थांबलेले जगदीशचंद्र म्हणाले की, चारधामला दररोज एक हजार लोकच जाऊ शकतात, इतर पर्यटनस्थळी असा कुठलाही नियम नाही, हे आश्चर्यकारकच आहे. कोरोना तर दोन्ही ठिकाणी होऊ शकतो. तिकडे, भाविकांबरोबरच चारधाम यात्रा मार्गावरील व्यापारी व पुरोहितांमध्येही नाराजी आहे. बद्रीनाथ संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी सांगितले की, पाच महिन्यांनंतर यात्रा सुरू करण्यात आली, पण मर्यादित संख्येमु‌ळे व्यापाऱ्यांच्या पोटावर गदा आली आहे. मंदिराचे पुरोहित तुंगनाथ कोटियाल यांनी सांगितले की, ई-पासच्या अनिवार्यतेमुळे भाविकांची संख्या मर्यादित आहे. भाविकांना दर्शनाशिवाय परत जावे लागत आहे.

कोरोना काळात प्रथमच ३० दिवसांचे बुकिंग मिळाले : हॉटेल मालक नेगी
मसुरीत लक्ष्मी पॅलेस हॉटेलचे मालक वीरेंद्र नेगी यांनी सांगितले की, आमच्याकडे एक महिन्याचे बुकिंग फुल्ल आहे. कोरोनाकाळात प्रथमच एवढे बुकिंग मिळाले आहे. गेल्या सात दिवसांत मसुरी, नैनितालमध्ये ६.५ लाखांवर पर्यटक आले आहेत. पुढील १० दिवसांसाठी बहुतांश हॉटेल बुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...