आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायत धर्मगुरु डॉ. शिवमूर्ती यांना अटक:​​​​​​​2 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील सर्वात प्रभावशाली मठाचे प्रमुख डॉक्टर शिवमूर्ती मुरुघा शरणारु यांना 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना कोर्टात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिस करणार कोठडीची मागणी

पोलिस आज पुन्हा खुल्या न्यायालयात त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत. तूर्त शिवमूर्ती यांची चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पण छातीत कळा येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एससी एसटी कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कर्नाटकचे एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) आलोक कुमार यांनी बीबीसीला बोलताना सांगितले की, डॉक्टर शिवमूर्ती यांना कोर्टापुढे सीआरपीसी कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवल्यानंतर अटक करण्यात आली.

मुलींच्या वसतीगृहाच्या वॉर्डनची चौकशी

पोलिसांनी रश्मी नामक आरोपी क्रमांक 2, ज्या की मठाच्या वसतीगृहाच्या वॉर्डन आहेत, त्यांच्याशीही अनेक तास चौकशी केली. त्यानंतर शिवमूर्ती यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मठाचे निलंबित अधिकारी एस.के. बस्वराजन यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

मठाच्या वसतीगृहाच्या वॉर्डन रश्मी यांनी जनता दल सेक्युलरचे माजी आमदार बस्वराजन यांच्यावर लैंगिक शोषण व धमकावण्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर त्यांच्या पत्नीवरही कथितपणे गुन्ह्याचे समर्थन केल्याचा आरोप केला होता.

स्वामी शिवमूर्ती यांच्यावर पोक्सो अंतर्गत म्हैसुरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी कथित लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या 2 मुलींनी त्यांच्याविरोधात सीआरपीसी कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवला होता.

राहुल गांधींनी नुकतीच घेतली होती भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑगस्टमध्येच पक्षाचे नेते डी के शिवकुमार व के सी वेणुगोपाल यांच्यासोबत चित्रदुर्गमधील मुरुघा मठाला भेट दिली होती. मुरुघा कर्नाटकातील एक प्रभावशाली संस्था आहे. तिथे नियमितपणे येणाऱ्या राजकारण्यांची संख्या मोठी असते. शरणारू यांनी राहुल यांना 'लिंगादीक्ष'ही केले होते. हा एक अधिकृत सोहळा असून, त्यात एखाद्या व्यक्तीला लिंगायत संप्रदायात निमंत्रित केले जाते.

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

शिवमूर्ती मुरुघा शरणारू यांच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दोन्ही मुलींनी आपले सलग 2 वर्षे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर म्हैसूर सिटी पोलिसांनी शिवमूर्ती मुरुघा शरणारू यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मठाच्या शाळेत शिकत होत्या मुली

आरोप करणाऱ्या अल्पवयीन मुली मठ संचलित शाळेत शिकत होत्या. त्यांचे वय अनुक्रमे 15 व 16 वर्षांचे आहे. धर्मगुरूने त्यांचे साडेतीन वर्षांहून अधिक काळापर्यंत शोषण केले. पीडित 24 जुलै रोजी वसतीगृहातून बाहेर पडली व 25 जुलै रोजी तिने कॉटनपेट पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी त्यांनी म्हैसूरच्या नजराबाद पोलिस ठाण्यात लिंगातय संताविरोधात एफआयआर दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...