आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करीचा 'धंदा' जाेरात:गुजरातेत मद्य तस्कर गब्बर, कमाई 200 कोटींहून जास्त; आंगडिया, बॅंकेद्वारे व्यवहार

अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यबंदी असलेल्या गुजरातमध्ये मद्य तस्करी एखाद्या उद्याेगासारखी बिनबाेभाट सुरू आहे. बाेटाद-अहमदाबादमध्ये ५५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर विषारी दारूच्या घटनेच्या तपासात ही बाब उजेडात आली. राज्यात मद्य तस्करीचे माेठे नेटवर्क असल्याचे दिसून आले आहे. त्यात मद्य आयात, वितरण-विक्री, वसुली, पैशांच्या देवाणघेवाणीसाठी बँक तसेच आंगडियाचादेखील वापर केला जाताे. गाेरखधंदा करणाऱ्यांचे नेटवर्क फुलप्रूफ आहे. म्हणजे दारू आणि पैशांचा पुरवठा अगदी बिनचूक केला जाताे. नागदान गढवी व विनाेद सिंधी नावाचे तस्कर (स्थानिक भाषेत बुटलेगर) हे नेटवर्क चालवतात. राज्याच्या निगराणी विभागाने केलेल्या कारवाईत या नेटवर्कचा भंडाफाेड झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत दाेन तस्करांनी ४४ काेटी रुपयांची उलाढाल केली आहे. आंगडियाद्वारे ही देवाणघेवाण झाली आहे. पाेलिसांनी त्यांच्या २० बँक खात्यांवर टाच आणली आहे. मद्य तस्करीतील रक्कम उद्याेग, व्यापाऱ्यांच्या कमाईहून जास्त आहे.

माेठा माेहरा, गाेरख ऊर्फ पिंटू गडरी
गुजरातमधील मद्य तस्करीतील माेठा चेहरा म्हणजे गाेरख ऊर्फ पिंटू गडरी. ताे एकटा गाेव्यातून गुजरातमध्ये दारू मागवताे. त्याचा मार्ग महाराष्ट्रातून जाताे. गुजरातजवळील नवापूरमध्ये गाेव्यातून आलेला माल गाेदामात साठवला जाताे. त्यासाठी नवापूरला सात गाेदामे बांधलेली आहेत. गडरीला गुजरातच्या तपास अधिकाऱ्यांनी मुंबईतून अटक केली. त्याच्या फाेनमधून त्याचे दक्षिण गुजरातमधील उच्चाधिकाऱ्यांसाेबत असलेले संबंधदेखील समाेर आले आहेत. त्याची मद्य तस्करीतून २०० काेटी रुपयांची उलाढाल आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ताे पाेलिसांना २ काेटी रुपयांचा हप्ता देताे.

नागदान-विनाेद तस्करीचे भागीदार; संभाषणाच्या पडताळणीसाठी स्पेक्ट्राेग्राफीची तयारी
तस्कर नागदान गढवी व विनाेद सिंधी या बेकायदा धंद्यातील भागीदार आहेत. वडाेदऱ्याच्या कर्जन व अहमदाबादच्या कणभा येथील प्रकरणांत दाेघांना अटक झाली. नागदानच्या माेबाइलमध्ये मद्याची आयात, विक्री, वितरणसंबंधी संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत. कुणासाेबत संभाषण झाले, याचा तपास केला जात आहे. शिवाय आवाजाच्या पडताळणीसाठी स्पेक्ट्राेग्राफीचीही तयारी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...