आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात सापडला लिथिअमचा मोठा साठा:काश्मिरातील साठ्यापेक्षा कैकपट जास्त, देशाची 80 टक्के मागणी पूर्ण होणार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानात लिथिअमचा मोठा साठा सापडला असून यामुळे भारताची लिथिअमची 80 टक्के मागणी पूर्ण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मिरात आढळलेल्या लिथिअम साठ्यापेक्षा हा साठा कैकपट जास्त आहे. राजस्थानातील दैगानामध्ये हा साठा आढळला आहे. राजस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले आहे.

80 टक्के मागणी पूर्ण करण्याचा अंदाज

अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार राजस्थानात आढळलेल्या लिथिअमद्वारे भारताच्या एकूण मागणीपैकी 80 टक्के मागणी पूर्ण होऊ शकते. यामुळे भारताचे लिथिअमसाठी चीनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. लिथिअमसाठी भारत सध्या पूर्णपणे परदेशी पुरवठ्यावर अवलंबून असून यासाठी भारताला मोठी रक्कमही मोजावी लागते.

टंगस्टन होते तिथेच लिथिअम सापडले

राजस्थानमधील लिथिअमचे साठे डेगाणा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सापडले आहेत. या ठिकाणाहूनच एकेकाळी देशाला टंगस्टन पुरवले जात होते. 1992-93 मध्ये चीनच्या स्वस्त निर्यात धोरणामुळे इथले टंगस्टन महाग पडू लागले. त्यामुळे याचे उत्पादन थांबवण्यात आले होते. आता इथे लिथिअम सापडल्याने या परिसराला पुन्हा गतवैभव मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

बॅटरीसाठी महत्वाचा धातू

लिथिअम हा एक नॉन-फेरस धातू असून मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीत त्याचा वापर केला जातो. लिथिअम हा जगातील सर्वात मऊ आणि हलका धातू आहे. यात रासायनिक ऊर्जा साठवून तिचे विद्युत उर्जेत रूपांतर केले जाते. सध्या वापरल्या जाणाऱ्या अनेक बॅटरींत लिथिअमचा वापर होतो. एक टन लिथिअमचं जागतिक मूल्य सुमारे 57.36 लाख रुपये आहे.