आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट, 4 कर्मचाऱ्यांना हटवले:लघुशंकाकांड; आरोपी अटकेत, एअर इंडिया सीईओंचा माफीनामा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क-दिल्ली विमान प्रवासादरम्यान बिझनेस क्लासमधील वृद्ध महिलेवर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा यास शनिवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्याची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शंकर वारंवार जबाब बदलत आहे. सहकार्य करत नाही. पोलिसांनी एअर इंडियाच्या ९ कर्मचाऱ्यांनाहीउर्वरित पाचारण केले आहे. त्यापैकी तिघांनी शनिवारी जबाब नोंदवले.

या प्रकरणात नामुष्की ओढवल्यानंतर एअर इंडियाने पायलट व चार कर्मचाऱ्यांना नाेटीस पाठवली. तपास होईपर्यंत त्यांना कामावरून कमी केले आहे. सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी माफी मागितली आहे. एअर इंडिया अल्कोहोल सुविधा धोरणाचा आढावा घेईल.

बातम्या आणखी आहेत...