आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Live Report Of Mallikarjun Temple At Srisailam On Monday, Online Pooja Performed By Over Eight Thousand Devotees During Corona Period

वेध श्रावणाचे:सोमवारनिमित्त श्रीशैलमस्थित मल्लिकार्जुन मंदिराचा लाइव्ह रिपोर्ट, कोरोना काळात आठ हजारांवर भाविकांनी केली ऑनलाइन पूजा

आंध्र प्रदेशच्या श्रीशैलमहून ताराचंद गवारियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी 5 हजार लोक आले होते
  • ज्योतिर्लिंग व शक्तिपीठ एकाच ठिकाणी असलेले देशातील एकमेव मंदिर

सकाळचे साडेपाच वाजले आहेत. कृष्णा नदीच्या किनारी श्रीशैल पर्वतावर वसलेल्या मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी थर्मल घेऊन उभे आहेत. दर्शनासाठी मंदिर ६ वाजता उघडेल. उत्तर भारतात आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणात विशेषत: सोमवारी लाखो भक्तांनी गजबजणारे हे मंदिर यंदा अगदी शांत आहे. तासन््तास रांगेत उभे राहून पूर्वी दर्शन व्हायचे. आता अवघ्या १० मिनिटांतच होते. ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ एकाच ठिकाणी असलेले हे एकमेव मंदिर आहे. येथे माँ पार्वती भ्रमरांबिकेच्या रुपात विराजमान आहे. पार्वतीचे नाव मल्लिका आणि शिवाचे नाव अर्जुन म्हणून या तीर्थक्षेत्राला मल्लिकार्जुन हे नाव पडले. मंदिराचे माहिती अधिकारी एच. मल्लिकार्जुन म्हणाले, “कोरोनामुळे मंदिरात होणाऱ्या सर्व ८ प्रकारच्या पूजांसाठी भक्तांना प्रवेश नाही. त्या ऑनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्वांचे मिळून शुल्क १११६ रुपये आहे. भाविक मंदिराच्या साइटवर अर्ज करतात. नंतर सेवेकरी त्यांच्या नावे पूजा करतात. भक्त ती ऑनलाइन पाहतात. १४ एप्रिलपासून ८ हजार पूजा झाल्या. कोरोनापूर्वी रोज १ हजारांवर पूजा होत. सध्या रोज ३ ते ४ हजार लोक येत आहेत. पूर्वी वर्षभर रोज ७० हजार लोक येत. महिन्याला ३ ते ४ कोटी दान येई. आतापर्यंत तरी श्रीशैलममध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. परिसर ग्रीन झोन आहे.’

0