आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Living A Normal Life With Only One Attack, So Tracing Is Difficult; Security Forces Prepared A List Of 10 Such Incidents

आता पार्टटाइम दहशतवादी:दहशतवादी केवळ एक हल्ला करुन जगताय सामान्य जीवन, यामुळे ट्रेसिंग कठीण; सुरक्षादलाने अशाच 10 घटनांची यादी केली तयार

नवी दिल्ली (मुकेश कौशिक)7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिगर मुस्लिमांवर हल्ल्याच्या संशयावरून 1000 संशयितांना ताब्यात घेतले

सोमवारी जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात लष्कराच्या JCO सह 5 जवान शहीद झाले. हल्लेखोर दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आजकाल दहशतवाद्यांनी एक मार्ग शोधला आहे, जेणेकरून त्यांना ओळखता येणार नाही. खरेतर, एलओसीवरील कठोरपणामुळे सैन्याला घुसखोरी रोखण्यात यश आले आहे. दुसरीकडे, घाटीमध्ये, लष्कराने, संशयित तरुणांच्या कुटुंबासह, नवीन दहशतवाद्यांच्या भरतीवरही जवळपास नियंत्रण मिळवले आहे. अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.

या कारणांमुळे दहशतवादी संघटनांकडे खोऱ्यात स्थानिक दहशतवाद्यांची कमतरता आहे. म्हणून, पाकिस्तानमधून कार्यरत दहशतवादी संघटनांनी पार्टटाइम दहशतवाद्यांकडून हल्ले करण्याची पद्धत स्वीकारली आहे. ही माहिती लष्करी गुप्तचर संस्थांना खोऱ्यात बसलेल्या हँडलर्सला पाकिस्तानातून पाठवलेल्या संदेशाला इंटरसेप्ट केल्याने मिळाली आहे. हे संदेश घाटीतील स्लीपर सेल्सच्या हँडलर्सला येतात.

गेल्या काही दिवसांमध्ये सामान्य नागरिकांवर जे हल्ले झाले, त्यामध्ये नवीन हल्लेखोर होते. त्यांचा यापूर्वीचा कोणताही रेकॉर्ड नाही. दहशतवादी संघटना त्यांना मोठी रक्कम देऊन त्यांच्या वापर करत आहेत. यानंतर त्यांचे दहशतवादी संघटनांसोबत नाते तोडून टाकतात, यामुळे त्याना ट्रेस करणे कठीण जात आहे. सुरक्षादालने अशा 10 घटनांची यादी तयार केली आहे.

यामुळे वाढले हल्ले
सरकारने काश्मिरी स्थलांतरित आणि पश्चिम पाकिस्तानी शरणार्थिंना 4.5 लाख स्वदेशी प्रमाणपत्र वितरित केले आहेत. यामुळे बिगर मुस्लिम उत्साहित होते आणि हेच दहशतवाद्यांच्या रागाचे कारण आहे. म्हणूनच केवळ हिंदूच नव्हे तर शीखांनाही लक्ष्य केले जात आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये दहशत पसरेल. नागरिक हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहेत.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, खोऱ्यातील हिंसेत वाढ ही दोन घटनाक्रमांदरम्यान झाली. पहिले- जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विकास प्रकल्प पाहण्यासाठी देशभरातील 160 हून अधिक पत्रकारांनी भेट दिली होती. या व्यतिरिक्त, 'आउटरीच प्रोग्राम' अंतर्गत केंद्रीय मंत्री आणि खासदारांचे वारंवार दौरे होत आहेत. दुसरे- गृहमंत्री अमित शहा ऑक्टोबरच्या शेवटी काश्मीरला जात आहेत.

बिगर मुस्लिमांवर हल्ल्याच्या संशयावरून 1000 संशयितांना ताब्यात घेतले
गेल्या आठवड्यात मखनलाल बिंद्रू सारख्या बिगर मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्याच्या गुन्हेगारांच्या शोधात सुरक्षा दलांनी 4 दिवसात एक हजाराहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. एकट्या श्रीनगरमध्ये 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

370 रद्द केल्यानंतर हिंदूंनी खोरे सोडले नाही
5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आले. तेव्हापासून 5 ऑगस्ट 2021 पर्यंत एकही हिंदू कुटुंब विस्थापित झाले नाही. जम्मू -काश्मीर प्रशासन याला आपले यश म्हणत होते. ही गोष्ट सतत दहशतवाद्यांना त्रास देत होती. त्यामुळे त्यांनी बिगर मुस्लिमांवर हल्ले सुरू केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...