आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एका न्यायालयाने निवडक लोकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) शुक्रवारी फटकारले. न्यायालयाने विचारले की, ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर तिला अटक का केली नव्हती. जॅकलिनवरिुद्ध सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी केली होती. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. त्याआधी ईडीने सांगितले की, जॅकलिनला पैशाची कमतरता नाही, ती सहज देश सोडून पळून जाऊ शकते. यावर न्यायालयाने विचारणा केली की, आतापर्यंत का अटक केली नाही? लूकआऊट नोटीसबाबत न्यायालय म्हणाले, अन्य आरोपी तुरुंगात असताना तिला अटक का केली नाही? जॅकलिनचे वकील म्हणाले, प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.