आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Local Warming Also Strains The Himalayas, 2500 M. Trees That Grow At Heights Are Now Found At An Altitude Of 4500 Meters!

हिमालयावर ताण:लोकल वॉर्मिंगनेही हिमालयावर ताण, 2500 मी. उंचीवर उगवणारी झाडे आता 4500 मीटर उंचीवर आढळतात !

डेहराडून24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल वॉर्मिंगसोबतच लोकल वॉर्मिंगचा व्यापक परिणाम उत्तराखंडमधील हिमालयीन क्षेत्रात दिसून येत आहे. हिमालयातील काही झाडे पूर्वी २५०० ते ३००० मीटरच्या उंचीवर उगवत होते. ते आता ४५०० मीटर उंचीवर आढळून येत आहेत. केवळ बर्फवृष्टीसाठी आेळखल्या जाणाऱ्या भागात आता पाऊस पडू लागला आहे. ग्लोबल वॉॅर्मिंगमुळे हिमालयातील थर अनेक किलोमीटर मागे घसरले आहेत, हे पूर्वीच्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. हा परिणाम शेकडाे वर्षांचा आहे. परंतु लोकल वॉर्मिंगमुळे खूप कमी कालावधीत त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहेत. उत्तराखंडमध्ये २५०० मीटरच्या उंचीवर हिमालयातील हिमालयन पाॅप्युलर ही वनस्पती आढळून येते होते. त्याचे शास्त्रीय नाव पाॅप्युलस सिलियाटा आहे. हीच वनस्पती आता या उंचीवर नष्ट झाली. कारण या वनस्पतीला आवश्यक अशी थंडी व आर्द्रता या उंचीवर मिळत होती. आता ही वनस्पती ४५०० मीटर उंचीवर मिळू लागली आहे. कधीतरी फुलांच्या खाेऱ्यात पायथ्याशी ही झाडे दिसत नाहीत. राज्य पक्षी मोनाल १९५१ पर्यंत ११०० मीटरपर्यंत दिसून येत होता. आता ताेही आणखी उंचीवर गेला आहे. उत्तराखंडमध्ये १९९९ पर्यंत ११०० मीटरपर्यंत बर्फवृष्टी होत. त्यानंतर तसे झाले नाही. आता हे पक्षी २५०० मीटर खाली येत नाहीत. उत्तराखंडमधील वरिष्ठ भूगर्भ संशाेधक प्राे. एमपीएस बिष्ट म्हणाले, लोकल वॉर्मिंगमुळे वणवे पेटू लागले, उष्णतेची लाट, प्रदूषण ही त्यामागील कारणे आहेत.

फुलपाखरांनाही उष्णतेचा त्रास, उंच ठिकाण गाठले
वाढत्या उष्णतेचा फटका पर्वतावरील फुलपाखरे आणि कीटकांच्या डझनावर प्रजातींना बसला आहे. हे जीव उंच ठिकाणी गेले आहेत. सरकारने केलेल्या एका पाहणीतून दिसून आले. लेपिडाेप्टेरा फुलपाखरांच्या ३५ टक्क्यांहून जास्त प्रजातींसाठी हिमालय हे घर आहे.

बातम्या आणखी आहेत...