आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lock Down Can Be Extend, Corona Continues To Rise; Odisha Locks Until 30, School Starts After 17 June

संभाव्य:कोरोनाचे थैमान सुरूच, लाॅकडाऊन वाढण्याच्या दिशेने; ओडिशा 30 पर्यंत लॉक, 17 जूननंतर शाळा सुरू

नवी दिल्ली/भुवनेश्वर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ८८% भारतीय म्हणतात, लॉकडाऊन वाढवा

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही सुरूच राहण्याची शक्यता आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला. असे करणारे ओडिशा पहिले राज्य ठरले आहे. तेथील शाळा-कॉलेज मात्र १७ जूनपर्यंत बंद राहतील. केंद्राने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रेल्वे तसेच विमानसेवा सुरू करू नये, अशी विनंतीही ओडिशाने केली आहे. दरम्यान, १५ एप्रिलपासून रेल्वे सुरू करण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेने म्हटले की, मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पांनीही त्यांचे मंत्रिमंडळ ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या बाजूने असल्याचे सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनीही लॉकडाऊन वाढवावा असे म्हटले आहे. मात्र पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांत होणाऱ्या व्हीसीत अंतिम निर्णय होईल. 

८८% भारतीय म्हणतात, लॉकडाऊन वाढवा

एक न्यूज प्लॅटफॉर्मने ४० हजार भारतीय अॅप युजर्सचे मत आजमावले आहे. त्यापैकी ८८% भारतीयांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा, असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...