आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lock Down Rules Break; The Crowd Of Guests At The Former PM H.D. Devegowda's Grandson Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थाटमाट:लॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली; माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडांच्या नातवाच्या लग्नात पाहुण्यांची गर्दी

बंगळुरूएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत 200-300 वाहनांसह 100 वऱ्हाडी

कोविड-१९ च्या साथरोगाचे थैमान सर्वत्र सुरू असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांचा विवाह शुक्रवारी माजी मंत्र्यांची नात रेवतीशी (२२) पार पडला. या विवाह सोहळ्यात १०० हून अधिक पाहुणे हजर होते. बंगळुरूपासून ४५ किमी दूर रामनगर जिल्ह्यातील बिदादी येथील फार्महाऊसवर झालेल्या विवाह सोहळ्याच्या व्हिडिओच्या फुटेजमध्ये लोकांची गर्दी दिसते आहे. कोणीही मास्क अथवा हातमोजे घातलेले नव्हते. मात्र, येथे सोशल डिस्टन्सिंगचा दावा केला जातोय. कुमारस्वामी यांचे माध्यम सचिव के. सी. सदानंद यांनी म्हटले, आधी हे लग्न बंगळुरू येथे नवरी रेवती यांच्या  निवासस्थानी होणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे विवाह स्थळ बदलण्यात आले. शहरापासून दूर एका फार्महाऊसवर या विवाहासाठी परवानगी घेण्यात आली होती. भाजपचे रामनगर जिल्ह्याचे नेते एम. रुद्रेश यांनी सांगितले, विवाह सोहळ्यासाठी १५० ते २०० वाहनांना परवानगी देण्यात आली असल्याची मला माहिती मिळाली आहे. 

काही सामाजिक कार्यकर्ते गरिबांसाठी भोजन वाटप करणार होते. पण त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली नव्हती. मग माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यात इतक्या वाहनांना परवानगी कशी काय देण्यात आली, अशी विचारणा आम्ही केली, असे रुद्रेश यांनी  पत्रकारांना सांगितले.  तर जनता दल (एस)चे नेते एन. एच. काेनारेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व नियमांचे पालन करुन परवानगी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. निखिल (२८) यांनी १० फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील कर्नाटकाचे नेते एम. कृष्णप्पा यांची नात रेवतीशी साखरपुडा पार पाडला होता. निखिलच्या आई अनिता रामनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

उत्तर प्रदेशात शामली येथे लॉकडाऊन काळातील पहिले लग्न

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील सूरज व स्वाती या नवरा-नवरीचा विवाह सात पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. लग्नात नवरा-नवरी व पाहुण्यांनी मास्क लावले हाेते.

महाराष्ट्रात लग्नाचा खर्च टाळून ५१ हजारांची मदत

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विलास बोके यांनी मुलीच्या लग्नात बडेजाव टाळून शिल्लक ५१ हजारांची रक्कम स्थानिक प्रशासनास कोरोना लढ्यासाठी दान केली आहे. लाॅकडाऊनमध्ये विलास बोके यांची मुलगी गीतांजलीचे लग्न एका साध्या कार्यक्रमात स्वप्निल रेड्डी यांच्यासोबत पार पडले. या लग्नात सोशल डिस्टन्सिंगसह लॉकडाऊनमधील सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या विवाह सोहळ्यात दोन्ही बाजूंकडील निवडक पाहुण्यांसह उपजिल्हाधिकारीही हजर होते. 

बातम्या आणखी आहेत...