आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन-2:मध्ये सूट अधिक मिळेल, एक तृतीयांश मार्गांवर रेल्वेसेवा सुरू केली जाऊ शकते, निवडक मार्गांवर विमानसेवाही...

नवी दिल्ली 3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीच्या संकटाने भारताला आर्थिक महाशक्ती होण्याची संधी उपलब्ध करून दिली : नरेंद्र मोदी

देशभरात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याबाबत केंद्र सरकार अाणि सर्व राज्य सरकारांमध्ये सहमती झाली आहे. केंद्राकडून अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही परंतु महाराष्ट्र सरकारने शनिवारी लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. ओडिशा अाणि पंजाबसह तीन राज्यांमध्ये आता लॉकडाऊन ३० तारखेपर्यंत वाढला आहे. 

विविध मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याबाबत जवळपास सर्वच राज्यांमध्ये एकमत झाले आहे. सुरुवातीला सरकारचे धोरण होते, जान है तो जहान है परंतु आता ते जान भी, जहान भी असे झाले आहे. केंद्र सरकार अाणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांमुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव घटण्यास खूपच मदत झाली अाहे. परंतु परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. सातत्याने निगराणी करावी लागणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम पुढील ३-४ आठवड्यांत दिसून येईल. 

भारताला नवी संधी...: या कोरोना संकटाने भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच महाशक्ती म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने नवी संधी दिली आहे.  आर्थिक व्यवहारांत सुसूत्रता आणायलाच हवी. परंतु, हे करत असताना कोरोनाविरुद्धच्या लढाईवर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असे मोदी म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊनच्या पुढील काळात रेल्वे व विमानसेवा हळूहळू सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

व्हीसीमध्ये किमान १० मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊन वाढवण्यास पाठिंबा : महाराष्ट्र,नवी दिल्ली, पंजाब,पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,हरियाणा यांचा समावेश.राज्यातील आर्थिक व्यवहार सुरू करावेत, अशी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची सूचना.

बातम्या आणखी आहेत...