आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन 3.0:ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सने कोणतेही सामान मागवता येणार, नव्या निर्देशांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याचीही मुभा, दारूची स्टँडअलोन दुकानेच उघडतील

सोमवारी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचे निर्देश लागू होत आहेत. यानुसार, ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये कटिंग सलून उघडता येतील. दोन्ही झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या इतर सामानाची डिलिव्हरी करू शकतील. रेड झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूच पुरवता येतील. रेड झोनमध्ये हेअर सलूनही उघडणार नाहीत. केंद्र सरकारने शुक्रवारी लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवले होते. यात ऑरेंज व ग्रीन झोनच्या जिल्ह्यांत बहुतेक बंधने शिथिल करण्यात आली, तर कंटेनमेंट झोन वगळता रेड झोनमध्ये सशर्त सूट आहे. काही बाबतीत संभ्रम असल्याने केंद्राने शनिवारी यावर स्पष्टीकरण जाहीर केले आहे.

मोलकरीण घरी येणार की नाही, आरडब्ल्यूए ठरवेल

मोलकरीण घरकामांसाठी जाऊ शकेल की नाही? हा निर्णय आरडब्ल्यूए घेईल की बाहेरील कुणाला आत येऊ द्यायचे की नाही. परवानगी मिळालीच तर काम करणारी व्यक्ती व तिला नियुक्त करणाऱ्यांना आरोग्याचा प्रोटोकॉल पाळावा लागेल. काही वाईट घडलेच तर त्याची जबाबदारी त्या संस्थेवर असेल.

दारूची स्टँडअलोन दुकानेच उघडतील

ग्रीन, ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये कंटेनमंेटबाहेर असलेली दारूची फक्त स्टँडअलोन दुकानेच उघडण्याची सूट मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...