आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 4 | After 55 Days Life Is Seen Returning To The Tracks But The Migration Of Workers Is Not Stopping

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा आणि वेदनेचे 10 फोटो:55 दिवसांनंतर रूळावर येताना दिसले आयुष्य, परंतु थांबले नाही कामगारांचे स्थलांतर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवासाच्या 100 जखमांवर भारी पडले हे हास्य - Divya Marathi
प्रवासाच्या 100 जखमांवर भारी पडले हे हास्य
  • फाळणीची आठवण करून देतात मजुरांच्या स्थलांतरणाची छायाचित्रे

55 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी सुरुवात झाली. बर्‍याच राज्यांत कठोर प्रतिबंध केवळ कंटेनमेंट झोनपुरते मर्यादित होते. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 13 राज्यांनी कंटेनमेंट झोन वगळता सर्व भागात आर्थिक क्रियाकलाप सुरू केले आहेत.लॉकडाउनमध्ये सूट मिळताच एकीकडे जीवन रूळावर परतताना दिसत आहे, दुसरीकडे मजुरांचे स्थलांतर अद्यापही सुरूच आहे. मजुर आजही रस्त्यावर आहेत. लोक घरी परतण्यासाठी सतत धडपड करत आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या स्थलांतरावर प्रियांका गांधी आणि यूपी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही चांगले तापले आहे. पण या सर्वात मजुरांचे दुःख मात्र कमी होताना दिसत नाही. पाहा दिलासा आणि वेदनेचे फोटो...

फाळणीची आठवण करून देतात मजुरांच्या पलायनाची छायाचित्रे 

देशभर रस्ते, राष्ट्रीय महामार्गांवर आज एकच चित्र दिसत आहे. डोक्यावर उपासमारी आणि मजबुरीचे ओझे घेतलेले कामगार देशाच्या आर्थिक केंद्रांमधून आपल्या गावाकडे परतत आहेत. राज्यांच्या दाव्यानंतरही बस आणि रेल्वेपेक्षा रस्त्यावर किंवा ट्रक-लोडिंग  वाहनात अधिक कामगार दिसत आहेत... अपघातांना बळी पडत आहेत, तरीही पावले थांबत नाहीयेत.

वरील ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो 1947 चा आहे. देशाच्या फाळणीच्या वेळी निर्वासितांनी भरलेला ट्रकचा. दुसऱ्या एका फोटोतही एका ट्रकमध्ये जनावरांप्रमाणे माणसांना बसवण्यात आलं आहे. मात्र हा फोटो 73 वर्षे जुना नाही तर आजच आहे. महाराष्ट्रातून निघालेले हे मजुर सोमवारी रांचीत पोहचला. 

ना खिशात पैसे , ना जेवण 

या स्थलांतरितांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांनी आपली भाड्याची घरे रिक्त केली आणि परत आले. अनेक दिवस आपल्या कुटुंबासोबत स्क्रिनिंग सेंटरच्या आसपास राहतात. प्रशासनाकडून मोबाइलवर मेसेज येईपर्यंत पोलिसांनी त्यांना भाड्याच्या घरातून न निघण्यास सांगितले. परंतु घरमालक पुन्हा त्यांना घरात घेत नाही असे उत्तर मिळते. अनेक मजुर परत गेले होते, मात्र घरमालकांनी त्यांना हाकलून लावले किंवा एका महिन्याचा किराया मागतात. काही लोकांनी सांगितले की, येथे काम करत होतो, मात्र घरमालकाने बाहरे काढले. खिशात पैसा नाही आणि खाण्यासाठी काही नाही. अशात घरी परतण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. बरेच दिवस आमच्या पाळीची वाट पाहत होतो, पण नंबर आला नाही. आता ऊन देखील वाढत आहे. संयमाचा बांध तुटला  जात आहे.

आता संयमाचा बांध तुटत आहे
आता संयमाचा बांध तुटत आहे

प्रतीक्षा संपत नाही

एकीकडे सूर्य आकाशातून आग ओकत आहे. सोमवारी 37 डिग्री तापमानात येथे पीआर 7 जवळ राधा स्वामी सत्संग भवनच्या बाहेर शेकडो कुटुंब आपल्या छोट्या मुलांसोबत गोरखपुरला जाणाऱ्या रेल्वेत जागा मिळण्याची वाट पाहत होते. फोटो-गीतांश गौतम

अखेर आमचा नंबर कधी येणार...
अखेर आमचा नंबर कधी येणार...

लॉकडाउनने रुग्णालयात कैद केले

कर्करोगाचा उपचार घेण्यासाठी आलेले 64 रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय लॉकडाउन झाल्यामुळे गेल्या 55 दिवसांपासून येथे रुग्णालयात अडकले आहेत. मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये रक्तपेढीच्या जुन्या इमारतीच्या कॅम्पसमध्ये रेडक्रॉस राहत आहे. येथे हे परिवार दररोज अशाप्रकारे आपल्यासाठी आळीपाळीने स्वंयपाक करतात. येथे थांबलेल्या लोकांना वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून लॉकडाउन काळात तांदूळ, पीठ, भाजीपाला, फळे, चटई आणि मच्छरदानी दान दिले आहे. फोटो स्टोरी- संदीप राजवाड़े

लॉकडाउनच्या चुली
लॉकडाउनच्या चुली

सूट देतीये संसर्गाला आमंत्रण 

हे दृष्य गुनाच्या सुगन चौकातली आहे. सोमवारी येथे बाजारात सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळाला. कापड बाजारासाठी मोठी गर्दी होती. जर असे नियम मोडत राहिले तर संसर्गाचा धोका टाळणे फारच कठीण होईल.

दुकाने उघडताच सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा
दुकाने उघडताच सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा

सवलत मिळताच जाम झाली दिल्ली 

सोमवारी दिल्लीत बाजार सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी वाहतून कोंडी झाल्याचे दिसून आले. दिल्लीसह देशातील 160 शहरांमध्ये टॅक्सी सुरू झाल्या आहेत. उबरने 31 शहरांमध्ये सेवा सुरू केली आहे.

सूट मिळताच झाली वाहतूक कोंडी
सूट मिळताच झाली वाहतूक कोंडी

55 दिवसानंतर दुकाने उघडली, ग्राहकही पोहचले

चंढीगड प्रशासनाने कंटेनमेंट झोन वगळता जवळपास संपूर्ण शहर उघडले आहे. 55 दिवसांपासून बंद असलेले काम आजपासून सुरू होईल. मार्केटच्या दुकानांवर ऑड-इव्हन सिस्टम लागू होणार नाही. हा फोटो सेक्टर 23 चा आहे. येथे दुकाने उघडली आणि ग्राहक देखील दिसले. फोटो - जसविंदर सिंह

55 दिवसानंतर बाजाराचे सौंदर्य परतले
55 दिवसानंतर बाजाराचे सौंदर्य परतले

अर्ध्या कर्मचार्‍यांसह सुरू झाले काम 

सरकारने लॉकडाऊनसह सवलत देण्याच्या घोषणेचा परिणाम सोमवारी बाजारात दिसून आला. लोकांची संख्या जास्त होती.  महिला देखील वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून आली. 

इंडसट्रीजमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामाला सुरुवात
इंडसट्रीजमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामाला सुरुवात

बातम्या आणखी आहेत...