आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 4 | Domestic Flights, Metro, Bus Can Be Start, Strict Restrictions In 30 Municipal Boundaries In 12 States?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4.0:देशांतर्गत उड्डाणे, मेट्रो, बस सुरू होण्याची शक्यता, 12 राज्यांतील 30 पालिका हद्दीत कठोर बंधने कायम?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनाला अटकाव करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपत आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपत आहे. मात्र, सद्य:स्थितीत सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा अपरिहार्य दिसत आहे. तो टप्पा ३१ मेपर्यंत चालेल. मात्र, या टप्प्यात अधिक सुविधा मिळतील. सूत्रांनुसार, देशांतर्गत विमानसेवा, मेट्रो, बस आणि ऑटोरिक्षांना मर्यादित सूट मिळू शकेल. शिवाय, केशकर्तनालये, रेस्तराँ, स्थानिक बाजारपेठा, घरगुती वस्तू-साहित्य दुरुस्तीची दुकाने काही कडक अटींसह ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सुरू करण्याला मंजुरी देण्याची तयारी सुरू आहे.

या सुविधा शक्य

>  शॉपिंग सेंटर व मॉलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांसह सुरू करण्याबाबत विचार. >  रेड झोनमध्ये जिल्ह्यांना कंटेनमेंट झोन ठरवण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो. उर्वरित जिल्ह्यांत अटींसह काही सूट मिळू शकते.

> हरियाणा सरकार विमान सेवेसह शाळा व विद्यापीठे उघडण्याच्या बाजूने आहे.

१२ राज्यांतील ३० पालिका हद्दीत कठोर बंधने कायम?

महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, प. बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, पंजाब व ओडिशातील ३० हून अधिक पालिकांत पूर्ण बंधने राहू शकतात. यात बृहन्मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे, दिल्ली, इंदूर, कोलकाता, जयपूर, नाशिक, जोधपूर, आग्रा, उदयपूर, मीरत आदींचा समावेश आहे.

औरंगाबादेत... : मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे येथे बंधने कायम राहू शकतात. दरम्यान, शहरात २४ मेपर्यंत कठोर बंधने कायम राहण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...