आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 4 First Day| Restrictions Relaxed In 16 States; All Industries, Markets Started, Bus taxi Ran

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4:16 राज्यांत निर्बंध शिथिल; सर्व उद्योग, बाजारपेठा सुरू, बस-टॅक्सी धावल्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत सोमवारी बाजारपेठा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिल्लीसह देशातील १६० शहरांत ओला टॅक्सी धावताहेत. उबरने ३१ शहरांत सेवा सुरू केली आहे. - Divya Marathi
दिल्लीत सोमवारी बाजारपेठा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिल्लीसह देशातील १६० शहरांत ओला टॅक्सी धावताहेत. उबरने ३१ शहरांत सेवा सुरू केली आहे.
  • निर्बंधांत शिथिलता नको, निर्बंध वाढवता येतील : केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
  • महाराष्ट्रासह काही राज्यांत मर्यादित सवलती, गुजरात आणि दिल्लीत सम-विषम सूत्रांनुसार दुकाने सुरू राहणार

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू झाला, तो ३१ मेपर्यंत राहील. यात केंद्र सरकारने फक्त कंटेनमेंट झोनपर्यंतच कडक निर्बंध मर्यादित केले होते. केंद्राकडून दिशानिर्देश मिळताच दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान,केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, प. बंगाल, तामिळनाडूसह १६ राज्यांनी कंटेनमेंट झोन वगळता सर्व भागातील आर्थिक कारभार सुरू केला आहे. दिल्ली, पंजाब, कर्नाटक आणि राजस्थानात बस सुरू झाल्या. कर्नाटक, पंजाब आणि राजस्थानात सलूनही उघडले. महाराष्ट्रात मात्र फक्त ग्रीन झोनमध्येच सवलती मिळतील. तर बिहारमध्ये फक्त कपड्यांची दुकाने सुरू होतील. दिल्ली आणि गुजरातेत सम-विषम सूत्रांनुसार दुकाने सुरू राहतील. मध्य प्रदेशात ग्रीन झोनमधील दुकाने उघडतील, सार्वजनिक वाहतूक बंद राहील. महाराष्ट्रात फक्त ग्रीन झोनमध्येच सवलती देण्याचा निर्णय झाला आहे. उत्तर प्रदेशात सार्वजनिक वाहतूक आणि बाजार सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही.

गुजरात : काम सुरू, २०० मजुरांनी घरी परतण्याचे तिकीट केले रद्द

नवसारी (गुजरात) | नवसारीहून आपल्या घरी उत्तर प्रदेश-बिहारला परतण्याची तयारी केलेल्या २०० मजुरांनी उद्योग सुरू होताच परतीचा विचार रद्द केला. परतीसाठी अलाहाबाद, पाटणा, गोरखपूर आणि लखनऊचे त्यांचे तिकीटही कन्फर्म झाले होते. मात्र, नवसारी िजल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत आहे असे त्यांना कळल्यानंतर त्यांनी घरी जाण्याचा विचार रद्द केला आणि रेल्वे तिकीट रद्द केले. वेजलपोर-नवसारीत फर्निचर तयार करणारे पन्नालाल मिस्त्री यांनी सांगितले की, आम्ही ५ जणांचे तिकीट बुक केले होते. १५ मे रोजी आमची रेल्वे होती. मात्र जाण्यापूर्वीच येथे काम सुरू झाले. तेव्हा आम्ही येथेच राहण्याचा निर्णय घेतला. घरी परतल्यानंतर तेथे काम मिळेल याची शाश्वती नाही. तेथे पोहोचल्यानंतर १४ दिवस क्वाॅरंटाइन राहावे लागेल. त्यामुळे आम्ही आता येथेच राहणार.

निर्बंधांत शिथिलता नको, निर्बंध वाढवता येतील : केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

केंद्र सरकारने म्हटले की, व्यापक सवलतींशिवाय राज्यांना लॉकडाऊनमध्ये समावेश असलेल्या निर्बंधांत सूट देता येणार नाही. राज्यांना निर्बंध वाढवता येतील, मात्र शिथिल करता येणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. काही राज्यांनी मॉल आदी सुरू करण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्राने निर्बंधांशी संबंधित दिशानिर्देशांचे कडक पालन करण्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...