आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 4 Fist Day| Violation Of Rules In Punjab, Temples Open; Salon Shops Open In Karnataka, Traffic On Roads In Delhi And Kerala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 4 चा पहिला दिवस:पंजाबमध्ये नियमांचे उल्लंघन, मंदिर उघडले; दिल्ली आणि केरळमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
चित्र अमृतसरमधील भद्रकाली मंदिराचे आहे. लोक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत सोमवारी पहाटे येथे पोहोचले. - Divya Marathi
चित्र अमृतसरमधील भद्रकाली मंदिराचे आहे. लोक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत सोमवारी पहाटे येथे पोहोचले.

देशातील लॉकडाउन-4 जा आज पहिला दिवस आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवला असला तरी निर्बंध केवळ कंटेनमेंट झोनपर्यंत ठेवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी देशतील विविध भागात याचा परिणाम पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅग-हेल्मेटची दुकाने उघडल्याची चित्र दिसून आले. 

दुसरीकडे, कर्नाटकात सलून उघडण्यात आले आहेत. दिल्ली आणि केरळच्या कोचिनमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पाहण्यास मिळाली. पंजाबच्या अमृतसरमध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात मंदिरे उघडण्यात आली आहेत. लोक येथे पुजा करण्यासाठी पोहचले. 

केंद्र सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर बस-टॅक्सी आणि इतर प्रवासी वाहनांना परवानगी दिली आहे. परस्पर संमतीने राज्ये आंतरराज्यीय बस देखील चालविण्यास सक्षम असतील. गृह मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले की कंटेन्ट झोनबाहेरील सर्व कामांना सूट देण्यात येणार आहे. सलून, ऑटोमोबाइल, वर्कशॉप, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे इत्यादी प्रकारची सर्व दुकाने आणि मार्केट उघडले जातील मात्र धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये बंद राहतील. 

पंजाब : मंदिरातील पुजारी म्हणाले- लोकांनी दर्शन घेण्याची विनंती केली 

अमृतसरमध्ये माता भद्रकाली मंदिर सोमवारी उघडण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर लोक दर्शनासाठी पोहचले. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले की, 'आम्ही लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले, मात्र कोणी ऐकायला तयार नव्हते. ते दर्शन करण्याची विनंती करत होते. आम्ही यावेळी सोशल डिस्टेंसिंगची काळझी घेतली. भाविकांनी लवकर यावे आणि जावे असे आम्ही ठरवले.' 

सोमवारी सकाळी अमृतसरच्या माता भद्रकाली मंदिरात लोक दर्शन घेण्यासाठी आले.
सोमवारी सकाळी अमृतसरच्या माता भद्रकाली मंदिरात लोक दर्शन घेण्यासाठी आले.
पंजाबमध्ये दुकाने उघडली.
पंजाबमध्ये दुकाने उघडली.

पंजाबमध्ये कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणे आजपासून उघडली जात आहेत. कर्फ्यू हटवण्यात आला आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. बससेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी आजपासून सरु होतील. मार्गदर्शक सूचनांनुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी आहे.

दिल्ली 

सोमवारी सकाळपासूनच दिल्लीच्या काही भागात वाहनांची वर्दळ दिसून आली.
सोमवारी सकाळपासूनच दिल्लीच्या काही भागात वाहनांची वर्दळ दिसून आली.

आरोग्य मंत्रालयानुसार, दिल्लीतील सर्व 11 जिल्हे रेड झोनमध्ये आहे. आता केंद्राने राज्यांना झोन निश्चित करण्यासाठी परवानगी दिली आहे. अशात दिल्लीतील अनेक भाग रेड झोनमुक्त होऊ शकतात. दिल्ली सरकारने मागणी केली होती की जिल्ह्यांच्या आधारे संपूर्ण शहर रेड झोन म्हणून घोषित करण्याऐवजी प्रभागांनुसार झोन निश्चित केले जावेत. दिल्ली सरकार केंद्राच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करेल असे सांगण्यात येत आहे. जर बसेस चालवल्या तर एका बसमध्ये फक्त 20 लोकांना बसण्याची परवानगी दिली जाईल. 

कर्नाटकच्या हुबळीमध्ये कंटेनमेन झोनबाहेर सलूनचे दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच बरीच दुकाने येथे उघडली.
कर्नाटकच्या हुबळीमध्ये कंटेनमेन झोनबाहेर सलूनचे दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच बरीच दुकाने येथे उघडली.

केरळ : 

हा फोटो कोचीचा आहे. येथेही सोमवारी सकाळी रस्त्यावर गर्दी दिसून आली.
हा फोटो कोचीचा आहे. येथेही सोमवारी सकाळी रस्त्यावर गर्दी दिसून आली.

पश्चिम बंगाल: 

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथेही सोमवारी सकाळी आठ वाजता अनेक दुकाने उघडली. यामध्ये फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅग-हेल्मेटच्या दुकानांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथेही सोमवारी सकाळी आठ वाजता अनेक दुकाने उघडली. यामध्ये फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅग-हेल्मेटच्या दुकानांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...