आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4.0:लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढले : मात्र, बंधने आता फक्त कंटेनमेंट झोनपुरती मर्यादित ठेवता येतील...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंटेनमेंट झोनबाहेर बाजारपेठा उघडतील, बस-टॅक्सीही सुरू
  • अंतिम निर्णय राज्यांवर : पब्लिक ट्रान्सपोर्ट, बाजारपेठांचा निर्णय राज्य बदलू शकतील

केंद्र सरकारने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवले असले तरी कडक निर्बंध केवळ कंटेनमेंट झोनपुरते मर्यादित केले आहेत. उर्वरित भागांत बस-टॅक्सी व इतर प्रवासी वाहने चालवण्यास सूट देण्यात आली. राज्ये संमतीने आंतरराज्य बसही चालवू शकतील. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, ज्या व्यवहारांवर विशेष उल्लेख करून बंधने घातली आहेत ती कंटेनमेंट झोनबाहेर उठवली जातील. म्हणजेच, सलून, ऑटोमोबाईल वर्कशाॅप, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे इत्यादी सर्व प्रकारची दुकाने व बाजारपेठ उघडता येईल. सर्व प्रकारचे शासकीय व खासगी कार्यालये तसेच औद्योगिक कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकेल. आधी त्यात कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली होती. ई-कॉमर्स कंपन्या कंटेनमेंट झोनबाहेर सर्व वस्तू-साहित्याची डिलेव्हरी करू शकतील. मात्र, याबाबत राज्य सरकारे कोणत्या झोनमध्ये कोणती बंधने घालायची, हे ठरवतील. शाळा-कॉलेज, मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा, धार्मिक-राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी कायम राहील. स्टेडियम व स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उघडता येतील. मात्र, प्रेक्षकांना यात प्रवेश नसेल. गृह मंत्रालयाने निर्देश दिले आहेत की, राज्य सरकारे या बंधनांत आणखी सूट देऊ शकणार नाहीत. गरजेनुसार यात कठोर नियम जोडले जाऊ शकतात.

असोचेमचे सरचिटणीस दीपक सूद म्हणाले, की केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण, बाजारपेठा उघडल्याने अर्थव्यवस्था वेग घेऊ शकेल.

हॉटेल-रेस्तराँ बंद राहील, मात्र भोजनाची होम डिलिव्हरी होऊ शकेल

1. सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांतून प्रवासी वाहतूक बंद. केवळ देशांतर्गत वैद्यकीय सेवा, एअर अॅम्ब्युलन्स किंवा सुरक्षेविषयी वाहतुकीस सूट असेल.

2. मेट्रो रेल्वे सेवाही बंद राहील.

3. शाळा, कॉलेज, शैक्षणिक, कोचिंग व प्रशिक्षण संस्था उघडल्या जाऊ शकणार नाहीत. सध्या ऑनलाइन व डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास सुरू राहील.

4. हॉटेल, रेस्तराँ व इतर हास्पिटॅलिटी सेवा सुरू नसतील. बस डेपो, रेल्वे स्टेशन व विमानतळांवर कँटिन बंद राहील. रेस्तराँ ग्राहकांना होम डिलिव्हरी देऊ शकतील.

5. देशभर सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, इंटरनेट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेम्ब्ली हॉल आणि अशी इतर ठिकाणे तूर्त उघडणार नाहीत. केवळ स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम उघडू शकतील. यात प्रेक्षकांना बंदी असेल.

6. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आयोजन आणि इतर समारंभांवर पूर्वप्रमाणे बंदी कायम राहील.

7. सर्व धार्मिक आणि पूजा स्थळे सामान्य लोकांसाठी बंद राहतील. धार्मिक मिरवणुकांना परवानगी राहणार नाही.

आंतरराज्य वाहतूक : राज्य ेसहमत असतील तर बस, खासगी वाहने चालू

> केंद्राने स्पष्ट केले आहे की, दोन राज्यांत सहमती असेल तर बस आणि इतर खासगी वाहनांच्या वाहतुकीची परवानगी दिली जाऊ शकते.

> सायं. ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी राहील. अनावश्यक कामासाठी लोकांना बाहेर पडता येणार नाही.

> ६५ वर्षांवरील लोक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना घरातच राहावे, असे सांगण्यात आले आहे.

> कंपन्यांत कामावर येणाऱ्या प्रत्येकाने मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप घ्यावे, अशा सूचना कंपन्यांनी द्याव्यात. प्रशासनाने तशी काळजी घ्यावी. परंतु अॅप बंधनकारक केलेले नाही.

हे नियम सर्वांसाठी :  मास्क घालणे आवश्यक, थंुकणे दंडनीय गुन्हा

> सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनीय गुन्हा असेल.

> सार्वजनिक वाहतूक आणि इतर ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. नाहीतर कारवाई होईल.

> लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकणार नाहीत.

> अंत्यसंस्कारातही २० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्यास बंदी राहील.

> दुकानांवर ग्राहकांमध्ये दोन मीटर अंतर राहील. एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक दुकानात जाणार नाहीत.

> कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, जेवढे शक्य आहे तेवढे कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सवलत द्यावी.

दोन राज्यातं निर्णय लागू :  पंजाब, आसामात कंटेनमेंट झोनबाहेर दुकाने उघडली

> पंजाब आणि आसाम सरकारने मंगळवारी कंटेनमेंट झोनबाहेर सर्व दुकाने व कार्यालये उघडण्याचा निर्णय लागू केला आहे. कार्यालयांतही कर्मचारी संख्येवर कोणतीही मर्यादा नसेल. सर्व कर्मचारी कामावर येऊ शकतील. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, की कंटेनमेंट झोन आणि नॉन कंटेनमेंट झोन निश्चित केले जातील. नॉन कंटेनमेंट झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

> केंद्राने झोन निश्चित करण्यासाठी काही निकष ठेवले आहेत. या आधारे राज्य जिल्हा, पालिका, उपविभाग, वॉड अशा झोनमध्ये विभागू शकतात.

गाड्या चालवण्यावर रेल्वेने म्हटले- सध्या लाॅकडाऊन ३.०चीच स्थिती कायम राहील

गृह मंत्रालयाने देशभरात रेल्वे चालवण्यावर बंदी घातलेली नाही. आगामी काळात रेल्वे सेवेत वाढ होईल असा अंदाज लावला जात आहे. सध्या श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांशिवाय १५ जोडी विशेष रेल्वे आणि मालगाड्या सुरू आहेत. मात्र, नव्या निर्देशानंतर रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले की, लॉकडाऊन ३.० मध्ये जी स्थिती होती, तीच सध्या राहील.

बातम्या आणखी आहेत...