आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 4.0 Possible, But Biggest Challenge To Prevent Infection In Villages: PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनवर 6 तास मंथन:लॉकडाऊन 4.0 शक्य, मात्र सवलतीही वाढणार, गावागावात होणारा संसर्ग रोखणे सर्वात मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊत स्कूटरवर जुगाड करून 9 प्रवासी घरी परतताना दिसले, तर मध्य प्रदेशात तळपत्या उन्हात तारा नेणाऱ्या ट्रकमधूनही लोक घरी जाताना दिसले. - Divya Marathi
लखनऊत स्कूटरवर जुगाड करून 9 प्रवासी घरी परतताना दिसले, तर मध्य प्रदेशात तळपत्या उन्हात तारा नेणाऱ्या ट्रकमधूनही लोक घरी जाताना दिसले.
  • राज्यांनी 15 मेपर्यंत कळवावे, कसा असावा लॉकडाऊन : मोदी

लॉकडाऊन काढण्याच्या धोरणाबाबत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सुमारे ६ तास चर्चा केली. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, तेलंगण, प. बंगाल आणि आसाम या सहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची बाजू मांडली. तर बिहार, तेलंगण आणि तामिळनाडूने रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित केले. तर राजस्थान आणि छत्तीसगडने झोन निश्चितीचे अधिकार राज्यांना देण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशने अधिक सवलतींची मागणी केली, तर गुजरातने लॉकडाऊन कंटेनमेंट झोनपर्यंतच मर्यादित ठेवण्याची बाजू मांडली. पंतप्रधान म्हणाले की, पुढे जाण्यासाठी संतुलित धोरण आ‌वश्यक आहे. गावागावांना संसर्गापासून वाचवणे हे मोठे आव्हान आहे. सूत्रांनुसार, त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचीही चर्चा केली. 

मुंबईत लोकल ट्रेन सुरू करा : उद्धव 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ग्रीन झाेनमधील उद्याेग सुरू व्हावेत. आवश्यक सेवेकऱ्यांसाठी लोकल रेल्वे सुरू करावी. केंद्राने अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे. 

दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले की, कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित दिल्लीत आर्थिक कारभार सुरू करावा.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी कडक लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना केली. ते म्हणाले, लॉकडाऊनबाहेर पडण्यासाठी राज्यांना अधिक सूट द्यावी. रेड झोनमधील लघुउद्योग सुरू व्हावेत. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी म्हणाले की, लॉकडाऊन वाढवू नये,  कंटेनमेंट झोनसुटीनंतर शाळा-कॉलेज सुरू करावेत. टप्पा पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सुरू करावी. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशातील वाहतूक थांबवण्याची मागणी केली. ते म्हणाले, ग्रीन झाेनमधील वाहतूकही बंद करा.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लॉकडाऊन ३१ पर्यंत वाढवण्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्यात व्हेटिंलेटर, टेस्टिंग किटची कमतरता आहे. मोठ्या संख्येने प्रवासी परतत आहेत. रेल्वे वाहतूकही थांबवावी.

रेल्वे सुरू, लॉकडाऊन सुरू ठेवण्यात काय अर्थ? 

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, केंद्राने या संकटकाळात राजकारण करू नये. निष्कारण बंगालला लक्ष्य केले जात आहे. केंद्राने सीमा खुल्या केल्या आहेत, रेल्वे सुरू केल्या आहेत आणि विमानतळ सुरू केले आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊन सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे? 

लॉकडाऊन काढण्यासाठी काळजी घ्या : डब्ल्यूएचओ 

कोरोना पुन्हा पसरण्याच्या चिंतेत डब्ल्यूएचओने सोमवारी इशारा दिला की, लॉकडाऊन काढण्याची तयारी करणाऱ्या देशांनी अत्यंत काळजी घेणे आ‌वश्यक आहे. जर्मनीने लॉकडाऊन काढण्यास घाई केल्याने तेथे रुग्ण वाढले होते.

बातम्या आणखी आहेत...