आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown 5.0 Meeting Between Home Minister Shah And Prime Minister Modi For Future Policy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:1 जूनपासून शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळे सुरू होणे शक्य, आगामी धोरणासाठी गृहमंत्री शहा व पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र : लॉकडाऊन वाढणार, शाळा एक जुलै रोजी सुरू होणार ?

देशात ६८ दिवसांच्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊन ४.० नंतरच्या धोरणाबाबत चर्चा झाली. शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या सूचना पंतप्रधानांना सागितल्या. अधिकाऱ्यांच्या मते, एक जूननंतर लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी निर्बंध निश्चितीत केंद्राची भूमिका मर्यादित राहील. सवलतीत वाढ करणे, त्या कमी करण्याचे अधिकार पूर्णत: राज्यांना मिळू शकतात. सूत्रांनुसार, राज्य एक जूनपासून शाळा, धार्मिक स्थळे आणि रेस्तराँ सुरू करणे किंवा मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, या सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केले जाऊ शकतात. कंटेनमेंट झोनमध्येच निर्बंध राहतील. मात्र, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह देशभरातील मॉल आणि थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊ शकते. अधिकाऱ्यांच्या मते, दर १५ दिवसांनी लॉकडाऊनचा आढावा घेतला जाईल. यात स्थानिक परिस्थितीनुसार राज्य निर्णय घेईल.

सर्वाधिक रुग्णांच्या ३० शहरांवर केंद्राचे लक्ष

सूत्रांनुसार, नव्या दिशानिर्देशांत केंद्राचा भर फक्त कंटेनमेंट झाेनवर राहू शकतो. येथील संसर्ग थांबवण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जातील. सूत्रांनी सांगितले, सध्या ३० महानगरपालिका क्षेत्रात देशभरातील ८०% हून जास्त रुग्ण आहेत. यापैकी १३ शहरांतील अधिकाऱ्यांसोबत कॅबिनेट सचिवांची बैठक झाली होती. एक जूनपासून कोणती वसाहत, कॉलनी, गल्ली, वॉर्ड किवा पोलिस ठाणे क्षेत्र कंटेनमेंट जाहीर करायचे हे महापालिका ठरवेल.

कर्नाटकनंतर प. बंगालमध्येही धार्मिक स्थळे सुरू होणार

कर्नाटकनंतर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक जूनपासून धार्मिक स्थळे सुरू करण्याची घोषणा केली आहे. कार्यालयांत पूर्ण संख्येने कर्मचारी असतील.

लॉकडाऊन १५ दिवस वाढवावा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला पाहिजे. ५० टक्के क्षमतेसह रेस्तराँ, जिम सुरू करावेत.

महाराष्ट्र : लाॅकडाऊन वाढणार

३१ मेनंतर राज्याच्या काही भागात लाॅकडाऊन ५ लागू करावा लागणार आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संपादकांच्या बैठकीत वक्तव्य केले.

- मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पुढच्या महिन्यात पावसाळी साथ आजार सुरू होतील. त्याची लक्षणे आणि कोविड-१९ ची लक्षणे एकच आहेत. त्यामुळे लाॅकडाऊन एकदम उठवला तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

- लाॅकडाऊन ५ मध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असावी, असे राज्य सरकारचे मत आहे. तसे केंद्राला कळवले आहे. लोकलच्या काही फेऱ्या तरी सुरू करणे आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र : शाळा एक जुलै रोजी सुरू होणार ?

पुणे | राज्यातील शाळा एक जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या मते, राज्य सरकारचे जूनमध्ये शाळा सुरू करण्याबाबत अद्याप ठरलेले नाही. एक जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दिवाळी,ख्रिसमसची सुटी कमी करून लॉकडाऊनमुळे बुडालेल्या दिवसांची भरपाई करण्याबाबत विचार सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यास शाळा १५ जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...