आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown 5.0 News | Islamic Centre Of India On Narendra Modi Govt Allow Reopening Of Religious Places From 8th June

अनलॉक अॅडवायजरी:इस्लामिक सेंटरचा सल्ला- मशिदींमध्ये कालीनचा वापर करू नये, प्रत्येकाने मास्क घालावा आणि एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे

लखनऊ2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने अटी-शर्तींसह 8 जूनपासून देशभरातील धार्मिक स्थळांना उघडण्याची मंजूरी दिली आहे
  • इस्लामिक सेंटरने म्हटले- 10 वर्षाखालील मुले आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनी मशिदीत जाऊ नये

केंद्र सरकारने 8 जूनपासून देशभरातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यात मशीददेखील सामील आहे. केंद्राच्या निर्णयानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने सोमवारी एक अॅडवायजरी जारी केली आहे. यात मशीदमध्ये येणाऱ्या व्यक्तीने कोणती सावधीगिरी बाळगावी, याबाबत सांगण्यात आले आहे.

अॅडवायजरीमध्ये नमाजादरम्यान 6 फुटांचे अंतर ठेवणे आणि नमाज झाल्यावर गळाभेट न घेण्यास सांगितले आहे. तसेच, 10 वर्षाखालील मुले आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनी मशिदीत जाऊ नये, असेही सांगितले आहे.

अॅडवायजरीनंतर 15 दिवस परिस्थितीवर लक्ष दिले जाईल

इस्लामिक सेंटरचे चेयरमन मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी ही अॅडवायजरी जारी करत म्हटले की, अॅडवायजरीनंतर 15 दिवसापर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि गरज पडल्यास परत एकदा अॅडवायजरी जारी केली जाईल.

मशिदीत नमाज पठणासाठी 14 पॉइंटी अॅडवायजरी

1. मशिदीत गर्दी जमा होऊ देऊ नये.

2. 10 वर्षाखालील मुले आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनी मशिदीत जाऊ नये.

3. मशिदीत फर्जची नमाज अदा केली जावी. सुन्नते आणि नफल घरीच अदा करा.

4. मशिदीत नमाजावेळी चार ग्रुप्स केले जातील. 15-15 मिनीटात हे लोक नमाज अदा करतील. 

5. शुक्रवारच्या नमाजासाठीदेखील हीच व्यवस्था असेल. लोकांना चार ग्रुप्समध्ये विभागले जाईल.

6. शुक्रवारचा खुतबा(नमाजापुर्वी दिले जाणारे उफदेश) लहान केला जाईल. उर्दूमध्ये तकरीर करू नये.

7. वुजू(हात पाय धुणे) घरातूनच करुन यावे.

8. नमाज मास्क घालुनच अदा करावी.

9. नमाजादरम्यान सहा फुटांचे अंतर असावे.

10. मशिदीमधून कालीन काढण्यात यावी. प्रत्येक नमाजापूर्वी फरशी फिनायल किंवा डेटॉलने साफ केली जावी.

11. वुजूखान्यात साबन ठेवण्यात यावी आणि साबनाने हात धुवावे लागतील.

12. मशिदीतील टोप्यांचा वापर करू नये, प्रत्येकाने आपली टोपी घरुनय आणावी.

13. मशिदीत येताना आणि जाताना गर्दी करू नये.

14. मशिदीत कोणालाही गळाभेट करु नका.

बातम्या आणखी आहेत...