आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Lockdown Big Breaking, Central Government's Big Announcement, Increase In Lockdown Till May 17, Corona Updates

लॉकडाउन वाढ:देशातील लॉकडाउनमध्ये 14 दिवसांची वाढ, आता 17 मे पर्यंत असेल लॉकडाउन; ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दिल्या जातील काही सवलती

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 14 दिवसांपर्यंत रेड झोनमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही

केंद्र सरकारने तिसऱ्यांदा लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमितांच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारे देशातील लॉकडाउनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. सध्या लॉकडाउन 3 मे पर्यंत होता, पण आता 4 मे पासून पुढे दोन आठवडे म्हणजेच 17 मेपर्यंत या लॉकडाउन असणार आहे.

शुक्रवारी गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. हे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. यापूर्वीच आरोग्य मंत्रालयाने सकाळी सांगितले होते की, सध्या देशभरातील 130 जिल्हे रेड झोनममध्ये आहेत, 284 ऑरेंज झोनमध्ये आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

सध्या असलेल्या लॉकडाउनची मुदत 3 मे ला संपणार आहे. सरकारने सांगितले की, या लॉकडाउनदरम्यान 14 दिवसांपर्यंत रेड झोनमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही. परंतू, ऑरेंज आणि ग्रीन झनमध्ये थोड्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. यापूर्वीच, पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी शुक्रवारी हायलेवल मीटिंग बोलवली होती. बैठकीत गृह मंत्री अमित शाह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ विपिन रावत, रेल्वे मंत्री पीयूष गोयलसह सेक्रेट्री लेव्हलचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

ही मुदतवाढ आपेक्षित होती- राजेश टोपे

लॉकडाऊनच्या मुदतवाढीवर प्रतिक्रीया देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “लॉकडाऊनची मुदतवाढ अपेक्षित होती. माझ्यासह स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या संवादामध्ये अनेकवेळा याची सूचक कल्पना दिली होती. कोरोनासाठी रेड झोन म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रामध्ये तशीही कोणतीही शिथिलता दिली जाणार नव्हती. ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्येच काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार आहे.”

देशभरात 35 हजारांच्या पुढे रुग्ण

जगभरात 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही मोठे नुकसान केले आहे. देशात लॉकडाउन असुनही संक्रमितांचा आकडा 35 हजारांच्या पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 1755 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 77 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सर्व झोनमध्ये यावर बंदी असेल

 • हवाई यात्रा, रेल्वे, मेट्रो, राज्यांतर्गत प्रावासावर बंदी.
 • स्कूल, कॉलेज आणि इतर एजुकेशनल इंस्टीट्यूट बंद.
 • हॉटेल्स, रेस्टोरेंट्स, सिनेमा हॉल, जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बंद.
 • कोणत्याच प्रकारचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी.
 • 65वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षांपेक्षा लहान मुले किंवा ज्यांना आधीच आजार आहे, अशांना बाहेर येण्यास बंदी.
 • ओपीडी, मेडिकल सर्जरी सेवा सुरू असतील.
 • जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवर बंदी.

रेड झनमध्ये काय सुरू असेल ?

 • सर्व उद्योग, कंस्ट्रक्शन कार्यांना परवानगी. यात मनरेगा, फूड प्रोसेसिंग यूनिट, विट भट्टी सुरू असेल.
 • ग्रामीण क्षेत्रात शॉपिंग मॉलसोडून सर्वच दुकाने सुरू राहतील. कृषी आणि पशु पालनशी संबधित उद्योग सुरू असतील.
 • बँक, फायनेंस कंपनी, इंश्योरेंस आणि कॅपिटेल मार्केट अॅक्टिविटी सुरू राहतील.
 • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, आयटी सेक्टर, डेटा आणि कॉल सेंटर, कोल्ड स्टोरेज, प्रायवेट सिक्योरिटी सर्विस सुरू असतील.
 • मॅन्युफैक्चिंगर यूनिटमध्ये ड्रग्स, फार्मा, मेडिकल डिवाइस, जूट इंडस्ट्री सुरू असेल. पण, यात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल.

ऑरेंज झोनमध्ये काय सुरू असेल ?

 • खासगी कार आणि कॅबमध्ये ड्रायवरशिवाय मागच्या सीटवर दोन पॅसेंजरला परवानगी.
 • जिल्ह्यांतर्गत वाहतुकीस परवानगी.

ग्रीन झोनमध्ये काय सुरू असेल ?

 • दारु, पान-गुटखा इत्यादींची दुकाने सुरू असतील. सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल आणि एका दुकानात 5 पेक्षा जास्त लोक नसावेत.
 • डिपोवरुन 50% बस चालवण्यास परवानगी, पण एका बसमध्ये फक्त 50 % प्रवासी असावेत.
 • सर्व ठिकाणी फिरण्यास परवानगी, पण सामाजिक अंतर पाळावे लागेल.