आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासात जवळपास 3.43 लाख रुग्णांची नोंद, दिल्लीत 10 एप्रिलनंतर सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे.

दिल्लीमध्ये शुक्रवारी कोरोनाचे 8,506 नवीन रुग्ण समोर आले. हे 10 एप्रिलनंतर एका दिवसात मिळालेल्या रुग्णांचा सर्वात कमी आकडा आहे. येथे पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 12.40% वर आला आहे. या दरम्यान 289 मृत्यूही झाले आहेत. गुरुवारी येथे 10489 केस समोर आल्या होत्या. 17 एप्रिलपासून 2 मेपर्यंत येथे सलग 25 हजार रुग्ण समोर आले होते. यानंतरपासून नवीन रुग्णांमध्ये घट होत आहे.

24 तासात जवळपास 3.43 लाख रुग्ण आढळले
देशात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. तर 3 लाख 44 हजार 570 बरे झाले आहे आणि 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात असे तिसऱ्यांदा झाले आहे जेव्हा नवीन रुग्णांपेक्षा जास्त जण बरे झाले आहेत. याच्या 4 दिवसांपूर्वी 10 मे रोजी 3.29 लाख केस आल्या होत्या आणि 3.55 लाख संक्रमित बरे झाले होते. दुसऱ्या दिवशी 11 मे 3.48 लाख नवीन रुग्णांच्या तुलनेत 3.55 लाख संक्रमित रिकव्हर झाले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस, म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 9 मे रोजी 37.41 लाख होती, जी आता कमी होऊन 37 लाख झाली आहे. गुरुवारी यामध्ये 5,753 ची घट झाली. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

केरळमध्ये सलग वाढत असलेले कोरोना प्रकरणे पाहता राज्य सरकारने 23 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शुक्रवारी सांगितले की, तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलप्पुरममध्ये ट्रिपल लॉकडाऊन लावले जाईल. येथे पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे. विजयन यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये 34,694 नवीन प्रकरणे समोर आली. 93 मृत्यूही झाले. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे. यामुळे सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :3.42 लाख
  • गेल्या 24 तासांमद्ये एकूण मृत्यू :3,997
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :3,44,570
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :2.40 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 2 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.62 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 37 लाख
बातम्या आणखी आहेत...