आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, 3 Sep 2021 Vaccination News And Live Updates

कोरोना देशात:आज सक्रिय प्रकरणे 4 लाखांपार जाण्याची शक्यता, सलग दुसऱ्या दिवशी 10 हजाराने वाढ

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • केरळ कोरोनाचा हॉटस्पॉट, देशातील 76 टक्के प्रकरणे या राज्यात

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे गुरुवारी 45 हजार 624 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, यात 34 हजार 665 लोक उपचार घेत बरे झाले तर 355 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. गुरुवारी यामध्ये 10 हजार 597 ने वाढ झाली.

सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय प्रकरणात 10 हजाराने वाढ झाली. यापूर्वी बुधवारी 10 हजार 365 सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली होती. देशात आजघडीला 3.93 लाख लोकांवर उपचार सुरु आहे. हा आकडा आज लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केरळ कोरोनाचा हॉटस्पॉट, देशातील 76 टक्के प्रकरणे या राज्यात
कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत असलेले केरळ एकमेव राज्य आहे. केरळात एका दिवसातील रुग्णसंख्या 32 हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशातील 76 टक्के रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र मृतांत पुढे आहे. एका दिवसात सर्वाधिक 183 मृत्यू नोंदवण्यात आले. बुधवारी देशात सुमारे 46 हजार रुग्ण आढळले व 509 मृत्यू झाले. त्यापैकी 32 हजार 694 रुग्ण एकट्या केरळात आढळून आल्याने प्रशासन चकित झाले. राज्यात 173 जणांचा मृत्यू झाला.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 45,624
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 34,665
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 355
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.29 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले : 3.20 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.39 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.97 लाख
बातम्या आणखी आहेत...