आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींना झाला कोरोना:सौम्य लक्षणे दिसल्यानंतर केली चाचणी, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेट झाले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाढता कोरोना पाहता बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व रॅल्या रद्द केल्या होत्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून केरळ, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये त्या प्रचारसभा घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाढता कोरोना पाहता बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व रॅल्या रद्द केल्या होत्या.

बंगालमधील सभेविषयी काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल म्हणाले होते की, 'कोरोनाची स्थिती पाहता मी पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व सार्वजनिक सभा स्थगित करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांनाही सल्ला देईल की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सार्वजनिक सभांच्या आयोजनाच्या परिणामांवर दिर्घ चर्चा करावी.'

केजरीवाल यांच्या पत्नीही संक्रमित, मुख्यमंत्री झाले क्वारंटाइन
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. त्यांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही क्वारंटाइन आहेत. काही दिवस ते घरुनच काम पाहतील.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण रुग्ण : 2.56 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 1,757
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :1.75 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.53 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 1.31 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.80 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 20.24 लाख
बातम्या आणखी आहेत...