आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 1 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांत 72 हजारांपेक्षा जास्त संक्रमित आढळले, 458 जणांचा मृत्यू; नवीन रुग्णांचा आकडा 172 दिवसांमध्ये सर्वात जास्त

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत जवळपास 122 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट ही भयावह होत आहे. देशात बुधवारी 72,072 आढळले. 40,417 लोक बरे झाले आणि 458 रुग्णांचा मृत्यू झाला. नवीनरुग्णांचा आकडा गेल्या 172 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. यापूर्वी 10 अक्टोबरला 74,418 प्रकरणे आले होते. मृतांचा आकडा गेल्या 116 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. यापूर्वी 5 डिसेंबरला 482 लोकांनी जीव गमावला होता.

देशात आतापर्यंत जवळपास 122 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास 1.14 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.62 लाख जणांनी जीव गमावला आहे. 5.80 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

तर महाराष्ट्रात बुधवारी 39,544 नवीन प्रकरणे समोर आली. यापूर्वी 2 दिवसांपासून सलग नवीन केस कमी होत्या. मंगळवारी 27,918, सोमवारी 31,643 आणि रविवारी 40,414 लोक पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यात आतापर्यंत 28.12 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 24 लाखांपेक्षा जास्त बरे झाले आहेत, तर 54,649 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या 3.56 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...