आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 10 April 2021

कोरोना देशात:24 तासात विक्रमी 1.44 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पहिल्यांदाच 10.40 लाखांपेक्षा जास्त, रिकव्हरी रेट कमी होऊन 90% वर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दिवसाच्या आत रिकव्हरी रेड 91% ने कमी होऊन 90% पर्यंत पोहोचला

देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.

अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देशभरात 77 हजार 199 लोक बरे झाले, तर 773 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 66 हजार 760 ची वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 40 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या फेजच्या पीकपेक्षाही खूप जास्त आहे. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला संक्रमणाचा पीक दिवस होता. या दिवशी देशात सर्वात जास्त 10.17 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. यानंतर हे आकडे कमी होत होते, मात्र आता पुन्हा एकदा परिस्थिती भयावह होत असल्याचे दिसत आहे.

एका दिवसाच्या आत रिकव्हरी रेट 91% ने कमी होऊन 90% पर्यंत पोहोचला
रिकव्हरी रेट सलग कमी होत असल्याचे दिसत आहे. एका दिवसाच्या आत 91.76% ने कमी होऊन 90.8% वर आला आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या आत यामध्ये जवळपास 8% घट झाली आहे. सर्वात कमी छत्तीसगडमध्ये 80.5% आणि महाराष्ट्रात 82% रुग्ण रिकव्हर झाले आहेत. येथे अ‍ॅक्टिव्ह रेट खूप जास्त आहे. छत्तीसगडमध्ये अजून 18.4% आणि महाराष्ट्रात 16.3% अ‍ॅक्टिव्ह रेट आहे.

आतापर्यंत देशात 1.32 लोक संक्रमित
देशात आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 2 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 19 लाख 87 हजार लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 68 हजार 467 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 लाख 40 हजार 993 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...