आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 12 April 2021

कोरोना देशात:गेल्या 24 तासात विक्रमी 1.69 लाख नवीन रुग्ण, जवळपास 6 महिन्यानंतर 900 पेक्षा जास्त मृत्यू; आज अ‍ॅक्टिव्ह रुग्णही 12 लाखांचा आकडा ओलांडणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1 कोटी 35 लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात कोरोनाचे रुग्ण रोज नवे विक्रम नोंदवत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये एक लाख 69 हजार 914 प्रकरणे समोर आली आहेत. हा देशात एका दिवसात आढळणाऱ्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 10 एप्रिलला 1 लाख 52 हजार 565 नवीन रुग्ण समोर आले होते.

दुसरीकडे नवीन संक्रमितांसह मृतांचा आकडाही सलग वाढत आहे. काल (रविवारी) 904 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे गेल्या 6 महिन्यात एका दिवसात जीव गमावणाऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 17 अक्टोबरला सर्वात जास्त 1,032 लोकांचा मृत्यू झाला होता.

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा देखील आज 12 लाखांचा आकडा ओलांडणार आहे. काल यामध्ये 93,590 ची वाढ झाली. यासोबतच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 11 लाख 95 हजार 960 वर पोहोचला.

आतापर्यंत 1.33 कोटी लोक संक्रमित
देशात आतापर्यंत 1 कोटी 35 लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 1 कोटी 21 लाख 53 हजार लोक बरे झाले आहेत. 1 लाख 70 हजार 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...