आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 38 दिवसांत आढळले सुमारे 2 लाख नवीन रुग्ण ; चोविस तासांमध्ये 25,578 रुग्णांची विक्रमी वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 47,009 नवीन रुग्ण आढळले; एकट्या महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 30,535 पार

देशात कोरोना संक्रमनामुळे नवीन रुग्णात मोठ्या प्रमाणावर भर पडत असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. चितेंची गोष्ट ही की, नवीन रुग्णांसोबत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील कमी होत नाही आहे. गेल्या 38 दिवसांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत तब्बल 2 लाखांनी वाढ झाली आहे. देशात 11 फेब्रुवारी रोजी 1.33 लाख पॉझिटिव्ह रुग्ण होते. गेल्या रविवारी त्यात भर पडत त्यांची संख्या 3.31 लाख एवढी झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे एका दिवसातील सर्वात मोठा आकडा असून त्यात 25,578 वाढ झाली आहे. यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी 24,610 नवीन रुग्ण आढळून आले होते.

रविवारी आढळले होते 47,009 नवीन रुग्ण

देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या चोविस तासात देशात 47,009 नवीन रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत देशात 21,206 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून यात 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णांची संख्या सतत वाढत वाढत असल्याने आज यामध्ये 28,653 नवीन रुग्णांची भर पडली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात आज 30,535 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वाधिक 24,886 नवीन रुग्ण आढळहून आले होते. त्यानंतर सर्वात जास्त रुग्ण आज सापडले आहे. यामुळे राज्यातील शासन आण‍ि प्रशासन दोन्ही चिंतेत आहे.

देशात आता एकूण 1 कोटी 16 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. 1 कोटी 11 लाख रुग्ण बरे झाले आहे. तर 1 लाख 60 हजार लोकांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजघडीला 3 लाख 31 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे सर्व आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

देशात पहिल्यांदा कोणत्यातरी राज्यात 30 हजार रुग्ण आढळले
देशात महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या रविवारी 30,535 पहिल्यांदा एवढे नवीन रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 18 मार्चला राज्यामध्ये 25,833 नवीन रुग्ण सापडले होते. गेल्या चोविस तासांमध्ये महाराष्ट्र राज्यात 11,314 रुग्ण उपचार घेत बरे झाले असून यामध्ये 99 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 24.79 लाख लोक कोरोनाच्या विळ्याख्यात आले आहेत. यामध्ये 22.14 लोक बरे झाले असून 53,399 लोकांना आपले प्राण गमावले आहे. आजघडीला राज्यामध्ये 2.10 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...