आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 13 January 2021

कोरोना देशात:सलग दुसऱ्या दिवशी 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 12.5  लाखांच्या पार, यामध्ये 12 दिवसांमध्येच 6.78 लाखांपेक्षा जास्त वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत जवळपास 1.37 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

देशात आतापर्यंत जवळपास 1.37 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1.22 कोटी बरे झाले आहेत. 1 लाख 71 हजार 89 जणांनी जीव गमावला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या या महिन्यात 11 दिवसांमध्येच 6 लाख 78 हजार 519 नी वाढली आहे. 1 एप्रिलला 5 लाख 80 हजार 387 अॅक्टिव्ह रुग्ण होते. जे वाढून 12 लाख 58 हजार 906 झाले आहेत. सोमवारी यामध्ये 62,946 ची वाढ झाली.

तर महाराष्ट्रात सोमवारी 51,751 नवीन रुग्ण आढळले. 52,312 रुग्ण बरे झाले आणि 258 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 34.58 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 28.34 लाख बरे झाले आहेत. तर 58,245 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 5.64 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...