आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 14 August 2021

कोरोना देशात:शुक्रवारी 38760 नवीन प्रकरणे, 35740 झाले बरे; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 2521 ची वाढ, बरे होणारे 21 दिवसात सर्वात कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी देशात कोरोना संक्रमणाचे 38,750 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आले आहेत. या दरम्यान, 477 लोकांचा मृत्यू झाला, तर 35,740 संक्रमित लोकांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या लोकांची संख्या 21 दिवसात सर्वात कमी आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी 35,144 लोक या आजारातून बरे झाले होते.

अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. शुक्रवारी 2,521 अॅक्टिव्ह केस वाढल्या. हे गेल्या 8 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. 5 ऑगस्टला यामध्ये 3,623 ची वाढ झाली होती. सध्या 3.81 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

केरळमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली. येथे 20,452 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर 16,856 लोकांनी या आजारावर मात केली. येथे 11 दिवसांनंतर, इतके कमी लोक बरे झाले आहेत. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी 15,626 रुग्ण कोरोनामधून बरे झाले होते.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती

येथे शुक्रवारी 6,686 लोक संक्रमित आढळले. 5,861 लोक झाले बरे आणि 158 लोकांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 63.82 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 61.80 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला. सध्या 63,004 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 38,760
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 35,740
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 477
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :3.21 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.13 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.30 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.81 लाख
बातम्या आणखी आहेत...