आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 15 April 2021

कोरोना देशात:नवीन रुग्णांची संख्या 2 लाखांच्या जवळपास, हे पहिल्या 'पीक'च्या दुप्पट जास्त; अॅक्टिव्ह रुग्ण आज 15 लाखांच्या पार होणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात बुधवारी 58,952 नवीन रुग्ण आढळले.

देशात कोरोना महामारी विक्राळ रुप धारण करत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 99 हजार 376 नवीन रुग्ण समोर आले आहेत. 93,418 बरे झाले आणि 1,037 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांचा आकडा गेल्यावर्षी 16 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या पीकपेक्षा दुप्पट जास्त झाला आहे. तेव्हा एका दिवसात सर्वात जास्त 97,860 रुग्ण समोर आले होते. यासोबतच अॅक्टव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 14 लाख 65 हजार 877 झाली आहे. ही 15 लाखांच्या पार होऊ शकते, कारण यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक लाखांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस समोर आल्या : 1.99 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 1,037
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे :93,418
आतापर्यंत एकूण संक्रमित :1.40 कोटी
आतापर्यंत कोरोनावर मात करणारे :1.24 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.73 लाख
सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :14.65 लाख

तर महाराष्ट्रात बुधवारी 58,952 नवीन रुग्ण आढळले. 39,624 रुग्ण बरे झाले आणि 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 35.78 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 29.05 लाख लोक बरे झाले आहेत. तर 58,804 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 6.12 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...