आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 17 April 2021

कोरोना देशात:24 तासांच्या आत विक्रमी 2.33 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, 1.22 लाख लोक बरे झाले; 1338 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 69.05% म्हणजेच 1.61 लाख रुग्ण केवळ 7 राज्यांमध्ये वाढले आहेत

देशातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक शहरात पहिल्या तुलनेत खूप जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शुक्रवारी पहिल्यांदा असे झाले जेव्हा एका दिवसाच्या आत विक्रमी 2 लाख 33 हजार 757 लोक संक्रमित आढळले. दरम्यान 1 लाख 22 हजार 839 रुग्ण रिकव्हरही झाले. संपूर्ण देशात आतापर्यंत 1.45 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. हे आकडे आज संध्याकाळपर्यंत दीड कोटीच्या पार होतील.

संक्रमणामुळे या 24 तासांच्या आत 1,338 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. मृतांचा हा आकडा सरकारी आहे. स्मशानघाट, कब्रिस्तानमध्ये पोहोचणारे मृतदेह यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. तिथून जे फोटो समोर येत आहेत, ती खरच भयावह आहेत. तुम्ही स्मशानघाट आणि कब्रिस्तानात लागलेल्या लांब रांगा पाहून याचा अंदाज लावू शकता.

69.05% म्हणजेच 1.61 लाख रुग्ण केवळ 7 राज्यांमध्ये वाढले आहेत
शुक्रवारी 1 लाख 61 हजार 422 म्हणजेच 69.05% नवीन रुग्ण केवळ 7 राज्यांमध्ये वाढले. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात 63,729, उत्तर प्रदेशात 27,360, देशाची राजधानी दिल्लीत 19,486, कर्नाटकात 14,859, छत्तीसगडमध्ये 14,912, मध्य प्रदेशात 11,045 आणि केरळमध्ये 10,031 लोक संक्रमित आढळले. याच राज्यांमध्ये सर्वात जास्त 939 म्हणजेच 70.17% मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

आज अनेक राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक
आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन देशातील सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करणार आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. या व्यतिरिक्त संसाधनांच्या संकटाविषयीही चर्चा केली जाईल. सोमवारी देशाच्या सर्व एम्स हॉस्पिटलचे डायरेक्टर्सची बैठक होईल. यामध्ये एम्समध्ये सुविधा वाढवण्यास सांगितले जाईल.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :2.33 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :1,338
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 1.22 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.45 कोटी
आतापर्यंत बरे झाले :1.26 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.75 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :16.73 लाख

बातम्या आणखी आहेत...