आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाच्या आव्हानावर सीरमचे वक्तव्य:पूनावाला म्हणाले - भारत सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश, या 2-3 महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होणे शक्य नाही

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 7% च्या खाली आला

कोरोनाची लस बनवणारी सर्वात मोठी कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, संपूर्ण लोकसंख्येला लस देण्यासाठी 2-3 वर्ष लागतील. मंगळवारी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये कंपनीचे CEO अदार पूनावाला यांनी भारताविषयी आपले मत दिले आहे. त्यांनी म्हटले की, आपण जगातील दोन सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमधून आहोत. एवढी मोठी लोकसंख्या असेल तर 2-3 महिन्यात सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले जाऊ शकत नाही. यामध्ये अनेक आव्हान असतात. पूनावाला म्हणाले की, कंपनीने भारतीय लोकांच्या किंमतीवर ही लस निर्यात केली नाही.

दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 7% च्या खाली आला
दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4,482 नवीन केस समोर आले आहेत. ही 5 एप्रिलनंतर नवीन रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे. तेव्हा 3,548 केस आल्या होत्या. लॉकडाऊनमुळे संक्रमणासोबतच पॉझिटिव्हिटी रेटमध्येही घट होत आहे. आता पॉझिटिव्हिटी रेट 7% च्या खाली आला आहे. मंगळवारी हा 6.89% होता. 16 मे रोजी पॉझिटिव्हिटी रेट 10.40% होता. या दरम्यान येथे 265 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 2.63 लाख नवीन रुग्ण, 4.22 लाख झाले बरे
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी होत आहे. काल देशात 2 लाख 63 हजार 21 लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एका दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता.

सोमवारी देशात कोरोना प्रकरणात 3 विक्रम नोंदवण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली. हा एका दिवसात कोरोनातून बरे होणाऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 8 मे रोजी 3.86 लाख लोक बरे झाले होते.

देशात कोरोना मरामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :2.63 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :4.22 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 4,334
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :2.52 कोटी
आतापर्यंत बरे झाले :2.15 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू :2.78 लाख
सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :33.48 लाख

बातम्या आणखी आहेत...