आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 2 August 2021

कोरोना देशात:एका महिन्यात 12.37 लाख नवे रुग्ण आढळले, 13.08 लाख झाले बरे आणि 24259 जणांचा मृत्यू, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वात जास्त 2.78 लाख प्रकरणे आली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • केरळमध्ये रविवारी सर्वाधिक प्रकरणे

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 40,627 नवीन रुग्ण सापडले, 36,627 बरे झाले आणि 424 जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारे, आता अॅक्टिव्ह केसेस म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 8 हजार 343 वर गेली आहे. त्यात सलग सहा दिवसांपासून वाढ होत आहे. 26 जुलै रोजी ते कमी होऊन 3 लाख 92 हजार 694 झाले होते.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान देशात 12.37 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली. या काळात 13.08 लाख रुग्ण बरे झाले आणि 24,259 मरण पावले. जुलैमध्ये, दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 7-14 जुलै दरम्यान जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली गेली. या आठवड्यात 2.78 लाख लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

केरळमध्ये रविवारी सर्वाधिक प्रकरणे
रविवारीही राज्यात 20,728 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह, येथे सक्रिय प्रकरणे 1,67,380 वर गेली आहेत. काल रविवारी 56 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आणि 17792 लोकांनी कोरोनावर मात केली

महाराष्ट्रातील स्थिती
येथे रविवारी 6,479 लोक संक्रमित आढळले. 4,110 लोक बरे झाले आणि 157 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 63.10 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 60.94 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.32 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 78,962 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासात एकूण रुग्ण : 40,627
 • गेल्या 24 तासात एकूण बरे झाले : 36,627
 • गेल्या 24 तासात एकूण मृत्यू : 424
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.16 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले : 3.08 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.24 लाख
 • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4.08 लाख

बातम्या आणखी आहेत...