आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 20 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:सलग तिसऱ्या दिवशी आढळले 2.50 लाखांपेक्षा जास्त रुग्ण, विक्रमी 1.54 लाख लोकांनी कोरोनावर केली मात

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 78.37% नवीन रुग्ण देशाच्या 10 राज्यांमध्ये आढळले

सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.

दुसरीकडे वाईट गोष्ट म्हणजे संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1.80 लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजार 550 लोकांनी जीव गमावला आहे. दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत देश पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज जवळपास 1,500 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हा आकडा 400-600 एवढा आहे. भारतात सोमवारी 1,757 रुग्णांचा मृत्यू झाला.

तर 78.37% नवीन रुग्ण देशाच्या 10 राज्यांमध्ये आढळले
सोमवारी 78.37% म्हणजेच 2.01 लाखांपेक्षा जास्त रुग्ण देशातील 10 राज्यांमध्ये सापडले. सर्वात जास्त महाराष्ट्रात 58,924 संक्रमित आढळले. उत्तर प्रदेशात 28,211, दिल्लीमध्ये 23,686, कर्नाटकात 15,785, केरळमध्ये 13,644, छत्तीसगडमध्ये 13,834, मध्यप्रदेशात 12,897, तामिळनाडूमध्ये 10,941, राजस्थानमध्ये 11,967, गुजरातमध्ये 11,403 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण रुग्ण : 2.56 लाख
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 1,757
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :1.75 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.53 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले : 1.31 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.80 लाख
 • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 20.24 लाख
बातम्या आणखी आहेत...