आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासांमध्ये 2.54 लाख नवीन संक्रमित आढळले, 3.52 लाख झाले बरे; 24 दिवसांनंतर उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 30 लाखांनी झाली कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात शुक्रवारी 4,142 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला.

देशात काल कोरोनाचे 2 लाख 54 हजार 288 नवीन रुग्ण सापडले. हा आकडा गेल्या 35 दिवसांमध्ये सर्वात कमी आहे. यापूर्वी 16 एप्रिलला 2.34 लाख संक्रमित समोर आले होते. दिलासादायक बाब म्हणजे या दरम्यान 3 लाख 52 हजार 944 लोक बरे झाले होते. तर रोज होत असलेल्या मृतांचा आकडा पुन्हा 4 हजारांच्या पार पोहोचला. देशात शुक्रवारी 4,142 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला.

अॅक्टिव्ह केस, म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 4 हजार 868 ची घट झाली आहे. देशात सध्या 29 लाख 20 हजार 21 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 30 लाखांनी खाली आला आहे. यापूर्वी 27 एप्रिलला 29.72 लाख अॅक्टिव्ह केस होते.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 2.54 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूम बरे झाले :3.52 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 4,142
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :2.62 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले :2.30 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :2.95 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 29.20 लाख

19 राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध
देशात 19 राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन सारखे निर्बंध आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मिझोरम, गोवा, तेलंगाना, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीचा समावेश आहे. येथे मागच्या लॉकडाऊन प्रमाणेच कठोर निर्बंध आहेत.

बातम्या आणखी आहेत...