आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना मृत्यूंमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर:देशात संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 3 लाखांच्या पार, अमेरिका आणि ब्राजीलमध्ये यापेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये नवीन केस कमी होऊन 2 हजारांपेक्षा कमी झाल्या

भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांची संख्या रविवारी 3 लाखांच्या पार झाली आहे. देशात गेल्या वर्षी 13 मार्चला संक्रमणामुळे पहिला मृत्यू झाला होता. याच्या 14 महिने 10 दिवसांनंतर मृतांची संख्या 3 लाख झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,02,744 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट कमजोर पडल्यानंतरही मृतांची संख्या कमी होत नाहीये. मेमध्ये दररोज जवळपास 3500 मृत्यू झाले. हे संपूर्ण जगात सर्वात जास्त आहे.

जगात आतापर्यंत केवळ दोन देशांमध्येच कोरोनामुळे 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. यामध्ये अमेरिका पहिल्या आणि ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये संक्रमणामुळे 6 लाख आणि ब्राझीलमध्ये 4.48 लाख मृत्यू झाले आहेत.

दिल्लीमध्ये नवीन केस कमी होऊन 2 हजारांपेक्षा कमी झाल्या
दिल्लीमध्ये कोरोनाचे प्रकरणे कमी होणे सुरूच आहे. रविवारी येथे 1,649 नवीन केस समोर आल्या. 30 मार्चनंतर येथे एवढ्या कमी केस आल्या आहेत. तेव्हा 992 लोकांमध्ये संक्रमणाची पुष्टी झाली होती. या दरम्यान 189 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मृतांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 200 पेक्षा कमी राहिली आहे. रुग्णांच्या आकड्यांसह दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेटही सलग कमी होत आहे. आता हा 2.42% झाला आहे. तरीही सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवला आहे.

दुसरीकडे दिल्लीजवळील हरियाणामध्येही राज्य सरकारने लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला आहे. मुख्य सचिव विजयवर्धन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पहिल्या 24 मेपर्यंत लावण्यात आलेले निर्बंध 31 मेच्या सकाळपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

देशात 35 दिवसांनंतर नवीन केस 2.5 लाखांपेक्षा कमी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी होत आहे. शनिवारी देशात 2 लाख 40 हजार 766 लोकांना कोरोनाचे निदान झाले आहे. देशात 35 दिवसांनंतर नवीन संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांनी खाली आला आहे. यापूर्वी 16 एप्रिलला 2 लाख 34 हजार 2 लोक कोरोना संक्रमित आढळले होते.

दरम्यान महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवण्याचे कारण बनला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनामुळे 3,736 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे या दरम्यान 3 लाख 54 हजार 825 लोक बरेही झाले आहेत.

अशा प्रकारे देशात अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक लाख 17 हजार 877 ची घट झाली आहे. सध्या देशात 28 लाख 403 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत.

काल विक्रमी 21.23 लाख टेस्ट झाल्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या म्हणण्यानुसार शनिवारी देशात कोरोना व्हायरससाठी 21 लाख 23 हजार 782 सँपल टेस्ट करण्यात आल्या. या केवळ भारत नाही तर जगात एका दिवसात केलेल्या टेस्टचा सर्वात मोठा आकडा आहे. देशात आतापर्यंत एकूण 32 कोटी 86 लाख 7 हजार 937 सँपल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...