आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 24 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:पहिल्यांदाच एका दिवसात विक्रमी 2.20 लाख लोक झाले बरे, 3.45 लाख नवीन रुग्ण; तर 2,620 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्ण वाढत आहेत, मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने वेग सर्वात कमी

दिर्घ काळानंतर आपणासर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते.

मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. एका दिवसात झालेल्या मृतांचा हा नवीन विक्रम आहे.

रुग्ण वाढत आहेत, मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने वेग सर्वात कमी
देशात कोरोनाचे आकडे हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. या प्रकरणात आपण जगात 119 व्या क्रमांकावर आहे. जेथे सर्वात जास्त प्रकरणे येत आहेत.

आंकड्यांनुसार भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 11,936 लोक संक्रमित आढळले आहेत आणि 136 लोकांचा मृत्यू होत आहे. एवढीच लोकसंख्या अमेरिकेत 98,000, बहरीनमध्ये 96,000, इजराइलमध्ये 91,000, फ्रान्समध्ये 83,000, बेल्जियममध्ये 82,000, स्पेनमध्ये 74,000 आणि ब्राझीलमध्ये 66,000 लोक संक्रमित आढळत आहेत. येथे लोकसंख्येच्या हिशोबाने मृतांचे आकडेही खूप जास्त आहेत. यावरुन स्पष्ट होते की, भारतात सध्या संक्रमण नियंत्रणात आहे. जर थोडी सावधगिरी आणि सतर्कता ठेवली तर हे कमी केले जाऊ शकते.

अॅक्टिव्ह रुग्ण आता 25 लाखांच्या पार
देशात अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज 25 लाखांच्या पार झाली आहे. सध्या देशात असे 25 लाख 43 हजार 914 रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी यामध्ये 1 लाख 21 हजार 770 ची वाढ झाली आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे :3.44 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :2,620
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :2.20 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :1.66 कोटी
आतापर्यंत बरे झाले :1.38 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू :1.89 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :25.43 लाख

बातम्या आणखी आहेत...